पिलीव येथे शासन निर्णयाचे पत्रक जाळून यूवा सेनेचा राज्य शासनाला घरचा आहेर…!
पिलीव/सुजित सातपुते
19 फेब्रुवारी 2020 रोजी मुंबई येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत निरा-देवघर धरनातील पाणी वाटप संदर्भात जो शासन निर्णय करण्यात आला.त्या निर्णयाच्या पत्रकाची माळशिरस तालुक्यातील पिलीव गावच्या अहिल्याबाई होळकर चौकात आज शुक्रवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी रात्री 8:00 वाजता होळी करुन शासन निर्णयाच्या विरोधात घोषणा देत सदर निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला.आम्हाला आमच्या फलटण,माळशिरस सांगोला व पंढरपूर या चार तालुक्याच्या हक्काचे पाणी मिळाले पाहिजे व हा अन्यायकारक निर्णय मागे घेण्यात यावा आशी मागणी यावेळी करण्यात आली.विशेष म्हणजे शासन निर्णयाची पत्रके जाळून निषेध करण्याचे आयोजन केले होते ते युवा सेनेचे माळशिरस विधानसभा प्रमुख शिवराज पूकळे यांनी त्यामुळे राज्य शासनाला हा घरचा आहेर आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही.या निर्णयामध्ये 55 % पाणी बारामतीकडील निरा-डावा कालव्यास व 45 % पाणीपुरवठा निरा-उजवा कालव्याला जो फलटण,माळशिरस,सांगोला व पंढरपूरकडे येतो आशा असमान व अन्यायकारक पाणी वाटपचा शासन निर्णय झाला आहे.

मुळात निरा-देवघर धरण खंडाळा,फलटण,माळशिरस या तालुक्यासाठी बांधलेले आहे.असे आसताना हे संपुर्ण पाणी फलटण,माळशिरस,सांगोला व पंढरपूर या तालुक्यांना मिळाले पाहिजे असे आसताना केवळ सदरील धरणास कालवे काढलेले नाहीत याचा गैरफायदा घेऊन व सत्तेच्या जोरावर दबाव तंत्राचा वापर करून आमच्या हक्काचे पाणी बारामतीकडे वळविले आहे.सदरच्या तलावातील 11.369 व 3.349 असे एकूण सुमारे 15 टी.एम.सी पाण्यावर प्रस्तावीत खंडाळा,फलटण व माळशिरस या तीन तालुक्यातील गावांचा हक्क आहे.परंतु या तालुक्यांना फक्त 45 % पाणी देवुन शासन कायम दुष्काळी आसणार्या तालुक्यांवर जाणूनबुजुन अन्याय करत असल्याचे शिवराज पुकळे यांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.मी राजकारण बाजूला ठेवून केवळ जनहितार्थ व शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठविला असून आज निर्णय पत्राची होळी करित आहे.हा अन्यायकारक निर्णय रद्द होइपर्यंत हे आंदोलन चालूच राहिल व लवकरच तीव्र आंदोलनाची दिशा ठरविली जाईल असे पुकळे यांनी सांगितले.सध्या युवासेनेचे पदाधिकारी आसताना सुद्धा आपल्या तालुक्याचे हक्काचे असनारे पाणी दुसर्याला देनार्या शासन निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे.निरा-देवघर धरनाचे पाण्यासाठी शिवराज पुकळे यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा,प्रांत कार्यालयावर रक्तदान आंदोलन अशी बरीच चळवळ उभा केली आहे.त्यामुळे शासन निर्णया विरोधात पुकळे अजून काय निर्णय घेतात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.सध्या तरी शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी असताना सुध्दा शासन निर्णयाचा निषेध केल्यामुळे राज्य शासनाला घरचा आहेर त्यांच्याकडुन मिळाला आहे.व या निर्णयाविरोधातील आंदोलन तीव्र केला जाईल आसा इशाराही त्यांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना दिला आहे.