शिवजयंती निमित्त पिलीव परिसरात विविध ठिकाणी छ.शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन…!

पिलीव/सुजित सातपुते
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 390 व्या जयंतीनिमित्त पिलीव परिसरात विविध संस्था,संघटना व शासकीय कार्यालयात विनम्र अभिवादन करण्यात आले.पिलीव ग्रामपंचायतीच्यावतीने आयोजित शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी सभापती संग्रामसिंह जहागीरदार यांचे हस्ते छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.यावेळी सरपंच नितीन मोहिते,उपसरपंच सौ.शमशाद काझी,अविनाश जेऊरकर,रघूनाथ देवकर,ग्रा.पं सदस्य सौ.सुषमा जामदार,सोनाली करमाळकर,संजय आर्वे,राजेंद्रसिंग जामदार,चंद्रकांत माळी,जीवन गुरव,दादासाहेब देशमुख,प्रमोद भैस,आरूणसिंग जामदार,समशेरसिंग रजपूत,मोहसीन शेख आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी संग्रामसिंह जहागीरदार,दामोदर लोखंडे रघुनाथ देवकर यांनी शिवचरित्राविषयी मनोगत व्यक्त केले.सुत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी अनिल सावळजकर यांनी तर आभार प्रदर्शन सरपंच नितीन मोहिते यांनी व्यक्त केले.तर ज्ञान वर्धिनी वाचनालयात ही महाराजांच्या प्रतिमेचे पूजन संग्रामसिंह जहागिरदार यांचे हस्ते करण्यात आले.
श्रीराम सह पतसंस्थेत शिवप्रतिमेचे पूजन चेअरमन राकेश भैस यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी व्यवस्थापक शिवाजीराव सावळजकर,ॲड.वैभव मेथवडे,लक्ष्मण भैस व मान्यवर उपस्थित होते.शासकीयरित्या शिवप्रतिमेचे पूजन तलाठी राजेंद्र जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी आण्णा कोपनर, रामचंद्र करडे उपस्थित होते.तसेच शाळा,विद्यालये,कॉलेजमध्ये,विजवितरण कंपनी व पिलीव परिसरातील ग्रामपंचायतींआदि ठिकाणी छ.शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *