पिलीव यात्रेतील पोलिसांच्या चोख बंदोबस्ताचे यात्रेकरूंसह पिलीव ग्रामस्थांकडून कौतुक..!
पिलीव / सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव गावचे ग्रामदैवत असणार्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेस दिनांक 9 फेब्रुवारी पासून प्रारंभ झाला होता त्याच यात्रेचा काल मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी देवीच्या महानैवद्याने समारंभ करण्यात आला.या 9 दिवसाच्या यात्रा कालावधीमध्ये उपविभागीय पोलीसाधिकारी नीरज राजगुरू व माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वंबर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर तोरडमल,शशिकांत शेळके,पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर,पोसई इंगळे व अकलूज विभागांतर्गत पोलीस स्टेशनमधील एकुण 52 कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने यात्रेमध्ये कोणताही अनुसुचित प्रकार न घडता यात्रा सुरळीत पार पडली.या देवीच्या दर्शनासाठी यात्रेमध्ये लाखो भाविक येतात त्याच गर्दीचा फायदा घेऊन आपला डाव साधण्यासाठी आलेल्या एकूण 9 संशयित महिलांना पकडून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.तर यात्राकाळात अवैध धंदे करणार्या एकूण 14 लोकांवर कारवाई करुन पिलीव परिसरातील एकूण 17 लोकांना हद्दपार करण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याने यात्रेमध्ये कोणीही अवैद्य धंदे करण्यासाठी पुढे सरसावले नाही.

महिलांच्या व मुलींच्या मागे फिरून टवाळखोरी करणार्या टोळक्यांना पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर यांनी आपला खाक्या दाखवून गार केले होते.त्यामुळे महिलांना व मुलींना दारुड्या पासून व टवाळखोरांपासून होणारा नाहक त्रास झाला नसल्याने महिला वर्गाच्या चेहर्यावर समाधान पहावयास मिळाले.पोलिसांच्या या चोख बंदोबस्ताचे पिलीवसह परिसरातील ग्रामस्थांडून कौतुक व अभिनंदन होत आहे तर पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळेच यंदाची यात्रा सुरळीत पार पडली असल्याचे ग्रामस्थांमधून चर्चिले जात आहे.
चौकट – रोडवेज कंपनीने ऐन यात्रा काळात रस्ता उकरुन ठेवल्याने वाहतुकीचा प्रश्न निर्माण होणार असल्याचे माझ्या लक्षात आले होते.त्यामुळे मी प्रत्येक पॉइंटला एक जबाबदार कर्मचारी नेमला होता.मी व माझ्या कर्मचाऱ्यांनी वर्दीवर असताना रोडवरती दगडाचे डिव्हायडर करुन येण्या-जाण्याचे मार्ग काढून दिले होते.त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली.
आदिनाथ महानवर
पोलिस उपनिरीक्षक पिलीव औट पोस्ट