अखेर शिंगोर्णीच्या माती चोरी प्रकरणातील विष्णू मेंगाणे व विनायक नष्टे या दोन आरोपींना अटक..!

पिलीव / सुजित सातपुते
दिनांक 18 जानेवारी 2020 रोजी कोंडीबा अण्णा करडे रा.पिलीव यांनी माझ्या शेतातून माती चोरी झाली असल्याची फिर्याद पिलीव पोलिसात दिली होती.त्यानुसार आरोपी नवनाथ पोपट नरळे,पोपट तुकाराम नरळे,विष्णू बळी मेंगाणे व विनायक भगत नष्टे सर्व राहणार शिंगोर्णी या चौघांवर 379,34 या कलमांतर्गत पिलीव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.परंतु गुन्हां दाखल झाल्यापासून वरील चारही आरोपी फरार होते.त्यातील आज बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी रोजी विष्णू बळी मेंगाणे व विनायक भगत नष्टे या दोन आरोपींना अटक करून MH13AH0178 या क्रमांकाचे जेसीबी वाहन व MH45S0974 या क्रमांकाचा ट्रॅक्टर जप्त करण्यात पिलीव पोलिसांना यश आले आहे.तर नवनाथ पोपट नरळे व पोपट तुकाराम नरळे हे दोन आरोपी अद्यापही फरार असल्याचे पिलीव पोलिसांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.सदर गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी नीरज राजगुरू,पोलीस निरीक्षक विश्वंबर गोल्डे व पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली पिलीव औट पोस्टचे हवलदार सुधीर गोडसे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *