मेट्रोब्रेन राज्यस्तरीय अबॅकस परीक्षा अकलूज मध्ये उत्साहात संपन्न.
मेट्रो ब्रेन अबॅकस कंपनीने 2020 यावर्षीची राज्यस्तरीय अबॅकस परिक्षा अकलूज ता. माळशिरस जि. सोलापूर येथे 9 फेब्रुवारी रोजी आयोजित केली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन व गुणवंत विद्यार्थी व शिक्षक बक्षीस वितरण कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय श्री. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
मेट्रो ब्रेन अबॅकस कंपनी दरवर्षी राज्यस्तरीय अबॅकस परीक्षेचे आयोजन करते. यावर्षीची परीक्षा अकलूज शहरांमध्ये घेण्यात आली. 9 फेब्रुवारी 2020 रोजी कांतीलाल सांस्कृतिक भवन अकलूज येथे सकाळी 9 वाजता परीक्षेस सुरुवात झाली. सदर परीक्षा ही वेगवेगळ्या कॅटेगिरी मध्ये घेण्यात आली. या परीक्षेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा, तालुका तसेच ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थी अकलूज नगरीत दाखल झाले. परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांपैकी जवळपास 325 गुणवंत विद्यार्थ्यांचा ट्रॉफी, मेडल व प्रमाणपत्र देऊन मा. श्री. विजय दादा यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. बेस्ट फ्रांचाईजी ऑफ द इयर हा सन्मान अहमदपूर येथील शिंदे अबॅकस अकॅडमी ला मिळाला. तसेच सोलापूर जिल्ह्याचा बेस्ट फ्रॅंचाईजी ऑफ द इयर हा सन्मान अकलूजच्या यश अबॅकस अकॅडमी ला मिळाला. गुणवंतांचा सन्मान मा. श्री. विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात श्री. संतोष लोहरे यांनी स्पर्धेच्या युगात अबॅकस चे महत्व व गरज याविषयी उपस्थितांना माहिती सांगितली. अबॅकस व मिडब्रेन मेमरी कोर्स चे प्रात्यक्षिक मुलांनी करून दाखविले. अबॅकस च्या मुलांनी कॅल्क्युलेटर पेक्षाही अधिक वेगाने गणित सोडविली तसेच मिडब्रेन मेमरी कोर्सच्या मुलांनी डोळ्यावर पट्टी बांधून रुबिक क्यूब अक्षरशः अर्ध्या मिनिटांमध्ये सोडून दाखविला. मुलांचे प्रात्यक्षिक पाहून उपस्थित प्रमुख पाहुणे व पालक यांनी आश्चर्य व्यक्त केले. दादांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर परीक्षेचे आयोजन अकलूज येथील यश अबॅकस अकॅडमीच्या संचालिका सौ. उर्मिला हनुमंत सुरवसे यांनी केले होते. परीक्षेची बैठक व्यवस्था, शिस्तबद्धता व बक्षीस वितरण कार्यक्रमाचे नियोजन पाहून दादांनीही त्यांचे अभिनंदन केले. अकलूज नगरीत प्रथमच राज्यस्तरीय अबॅकस परीक्षेचे आयोजन झाल्यामुळे कार्यक्रमास मोठ्या प्रमाणावर अकलूजकर उपस्थित होते. सदर कार्यक्रमास रोटरी क्लब अकलूज चे अध्यक्ष श्री. स्वप्निल शहा माजी अध्यक्ष श्री.नवनाथ नागणे मनशक्ती प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट श्री.प्रवीण कारंडे, मेट्रो ब्रेन अबॅकस कंपनी चे अध्यक्ष श्री. संतोष लोहारे, संचालिका सौ. सीमा लोहारे पत्रकार श्री.नाना कुंभार, श्री. कृष्णा लावंड, श्री.शशिकांत कडबाने आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. गुजर सर व सौ. जाधव मॅडम यांनी केले श्री. हनुमंत सुरवसे यांनी उपस्थितांचे आभार मानले.