पिलीवच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा…!

पिलीव/प्रतिनिधी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित “युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव २०१९-२०” मधील वक्तृत्व स्पर्धेत पिलीव येथील कु.मेघाराणी रघुनाथ देवकर हिने ‘युवाशक्ती म्हणजे राष्ट्रशक्ती’ या विषयावर आपले विचार व्यक्त करून उपस्थित श्रोत्यांना व मान्यवरांना मंत्रमुग्ध करून सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवला.त्याबद्दल तिला प्रशस्तीपत्रक व सन्मानचिन्ह देऊन विद्यापीठाच्या कर्तव्यदक्ष कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस,डॉ.वसंत कोरे,डॉ.प्रभाकर कोरे,डॉ.व्यंकटेश मेतन या मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.मेघाराणी देवकर हिने यापूर्वीही अनेक जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत,महाराष्ट्र राज्य स्वच्छता व पाणीपुरवठा करंडक स्पर्धेत, कर्मवीर विद्या प्रबोधिनी,सार्वजनिक गणेशोत्सव तसेच अनेक संस्थांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.

मला कुलगुरू डॉ.मृणालिनी फडणवीस,प्रा घनवट,प्रा. उन्हाळे,सर्व विद्यापीठ स्टाफ,प्रा.चांगदेव कांबळे,प्रा.मयुरी जाधव,चैतन्यकुमार देवकर,प्लास्टिक बंदी प्रचारक के.डी सातपुते,मोहिनी देवकर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले असल्याचे मेघाराणीने माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले. तिच्या या यशाबद्दल सद्गुरु श्री श्री साखर का.लि श्री श्रीनगर राजेवाडी चेअरमन श्री. एन शेषागिरी राव ,व्हाईस चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील, संचालिका उषाताई मारकड,श्रीराम गणेश मित्र मंडळ पिलीव, श्रीराम दुर्गामाता नवरात्र महोत्सव मंडळ पिलीव, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिलीव यांनी अभिनंदन केले.तिच्या या यशाबद्दल विविध स्तरातून तिचे कौतुक होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *