पिलीव गावची कु.शिवानी मदने हिची हैद्राबाद येथे फोर्ज कंपनीची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड..!
पिलीव / प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील झिंजेवस्ती येथील कु.शिवानी अशोक मदने-पाटील हिची फोर्ज कंपनीच्या कल्याणी राफेल ॲढव्हान्स सिस्टीम डी.ई.टी पदाच्या कामासाठी हैद्राबाद येथे प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करण्यात आली असून कु.शिवानी मदने पाटील ही सध्या तासगाव येथील गव्हर्नमेंट रेसिडेंटलवूमन पॉलीटेक्नीकल कॉलेज मध्ये शेवटच्या वर्षात शिकत आहे.या महाविद्यालयात ईलेक्ट्रीकल या विषयासाठी शिकत आहे. तिने फोर्ज कल्याणी कंपनी कडे निवडीसाठी परीक्षा दिली होती.त्यामुळे तीची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड केल्याचे पत्र कंपनीने तिला दिले आहे.सदरच्या निवडीमुळे शिवानीचे पिलीवसह पंचक्रोशीतील विविध स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
