अकलुज येथील तडीपार आरोपींनी केलेल्या हल्ल्यात अक्षय चंदनशिवे याचा मृत्यू …!

अकलुज / प्रतिनिधी
दहा दिवसापुर्वी सोलापूर जिल्ह्यातुन तडीपार केलेल्या अकलुजच्या आरोपींनी सराटी ता.इंदापुर येथे केलेल्या हल्ल्यात जखमी झालेला अक्षय राजेंद्र चंदनशिवे वय २२ वर्ष रा. रमामाता चौक अकलुज ता. माळशिरस याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.या बाबत सात जणांविरुध्द पोलीसात खुनाचा गुन्हा नोंद झाला असून घटनेनंतर आरोपी पसार झाले आहेत.
सदर घटने बाबद पोलीसाकडून मिळालेल्या माहीतीनुसार अकलुज पोलीसांनीगेल्या दहा दिवसापुर्वी आकाश उर्फ आण्णा राजेंद्र कोळेकर, तुषार राजेंद्र काटे, सोमनाथ बिरुदेव रुपनवर, विकास महेश शिंदे, नितीन उर्फ पप्पू बाळू पवार, सिद्धांत नानासाहेब ताकतोडे सर्व रा. व्यंकटनगर अकलुज,रहिमान उर्फ सुलतान दिलावर
बागवान रा,जुनी बाजारतळ अकलुज यांचेवर सोलापुर जिल्ह्यातुन तडीपारीची कारवाई केली होती.दि.१४ फेब्रुवारी रोजी युवराज गायकवाड,अभिषेक गायकवाड, सोजल गायकवाड,मनोज गायकवाड,सुहास गायकवाड, निलेश लोखंडे असे सर्वजण भांडगांव ता.इंदापूर येथे जेवणासाठी गेले होते तर अक्षय राजेंद्र चंदनशिवे हा इंदापूर येथे लग्नासाठी गेले होते.हे सर्वजण बावडा ता.इंदापुर येथे एकत्र भेटल्यानंतर मोटारसायकल वरुन अकलुजला येत आसताना सराटी गावचे जवळील जिजामाता शाळेच्या नजीक रोडवर ४.३० वा.चे सुमारास
आकाश उर्फ आण्णा राजेंद्र कोळेकर,तुषार राजेंद्र काटे, सोमनाथ बिरुदेव रुपनवर,विकास महेश शिंदे,नितीन उर्फ पप्पू बाळू पवार,सिद्धांत नानासाहेब ताकतोडे रहिमान उर्फ सुलतान दिलावर यांनी पाठलाग करुन व रस्त्याला गाड्या आडव्या लावुन थांबवले.व तुम्ही एकत्र का फिरता असे म्हणत जवळ येवून, ये मारचोद हो तुमच्या गाड्या थांबवा, तुम्हाला लय मस्ती आली आहे काय, थांबा नाहीतर तुम्हाला जिवंतच ठेवत नाही असे म्हणून स्टिल पाईप,लोखंडी टाँमी,काठ्यानी अक्षय चंदशिवे यास मारहान सुरु केली त्यावेळी फिर्यादी अदर्श गायकवाड हा सोडवण्यास गेला असता त्यालाही मारहान केली तर इतर माराच्या भितीने पळून गेले.अक्षय याचे हातावर, डोकीत,पायावर,पाठीत मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला होता.हल्लेखोर हे हल्ला करुन इंदापुरच्या दिशेने पळुन गेल्यानंतर,अक्षयच्या मित्रांनी त्यास अकलुज येथे उपचारासाठी आणले होते.येथिल खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना दि.१५ फेब्रुवारी पाहाटे ५ वा.सुमारास अक्षय चंदनशिवे यांचा मृत्यू झाला.आदर्श दिपक गायकवाड रा.अकलुज याने दालेल्या फिर्यादीवरुन आकाश उर्फ आण्णा राजेंद्र कोळेकर, तुषार राजेंद्र काटे, सोमनाथ बिरुदेव रुपनवर, विकास महेश शिंदे,नितीन उर्फ पप्पू बाळू पवार,सिद्धांत नानासाहेब ताकतोडे रहिमान उर्फ सुलतान दिलावर यांचे विरुध्द भादवि ३०२, ३२४, ३२३, ३४१, ५०४,५०६, १४३, १४७, १४८, १४९ सह अनु. जा.ज.अत्याचार प्रतिबंध अधि. १९८९ वे कलम ३(२), ३(२)(व्ही.ए.) प्रमाणे गुन्हा नोंद झाला आहे.सदरची घटना इंदापुर पोलीस ठाणे हद्दीत घडला असल्याने अकलुज पोलीसांनी पुढील तपासकामी इंदापुर पोलीस ठाणे येथे वर्ग करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *