श्रीपूर येथील तडीपार असणाऱ्या मटका बहाद्दरांकडून पोलिसांच्या आदेशाला केराची टोपली : तडीपार असूनही राजरोसपणे घेत आहेत मटका..!
पिलीव/सुजित सातपुते
अकलूज पोलीस ठाणे अंतर्गत 26 जानेवारी 2020 रोजी तीन गुन्हेगारी टोळ्यांमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या 14 जणांवर तडीपारीची कारवाई केली असल्याची माहिती अकलूज पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक भगवानराव निंबाळकर यांनी दिली होती.सदरच्या तडीपारी कारवाईमध्ये माळशिरस तालुक्यातील श्रीपूर येथील एकुण 10 आरोपींचा समावेश असून यामध्ये बहुतांशी सराईत मटका बहाद्दर मालक व एजंट आहेत.यांना एक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.परंतु सदरील आरोपींचा श्रीपूरमध्येच वावर असल्याचे बोलले जात आहे.या आरोपींवर अनेक गुन्हे दाखल असल्याने त्यांना तडीपार करण्याबाबतचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते.त्यांनतर ही तडीपारीची कार्यवाही करण्यात आली आहे.परंतु म्हणतात ना “अवैद्य धंदा करावा तो मुजोरांनीच” त्याचप्रमाणे श्रीपुर मध्ये तडीपारीतील सराईत मटका बहाद्दर राजरोसपणे आपली दुकाने खुली करून चक्क उघड्या टपरीमध्ये मटका घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.त्यामुळे श्रीपुर परिसरातील तरुण पिढी मटक्याच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे.प्रांताधिकारीच्या व पोलिसाधिकाऱ्यांच्या आदेशाला झुगारून जर हे मटका बहाद्दर इतकी मजल मारत असतील तर यांना नेमका कोणाचा वरदहस्त आहे हे शोधणे तितकेच गरजेचे आहे.असे श्रीपूर मधील जनतेतुन चर्चिले जात आहे.
चौकट :- आमची कारवाई चालूच आहे.तरी ही माहीती घेवून कारवाई करु सापडेल त्याला सोडणार नाही त्यांच्यावर रितसर कारवाई करुन गुन्हें दाखल करणार असल्याचे श्रीपूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधिर तोरडमल यांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.
