त्या सामुहिक बलत्कारामध्ये पिलीवच्या “गौरव भोसले”चा समावेश..!

पिलीव/सुजित सातपुते
सोलापूर शहरातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर दहा जणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी दहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील 5 संशयितांना अटक करण्यात आली आहे तर इतर 5 आरोपींचा रात्री उशिरापर्यंत शोध सुरू होता.या प्रकरणामध्ये माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील गौरव विलास भोसले,वय – 30 रिक्षा चालक (सध्या राहणार निराळे वस्ती मुरारजी पेठ सोलापूर) याचा ही समावेश असल्याने पिलीवसह परिसरातील हा चर्चेचा विषय बनला आहे.सामूहिक बलात्कार प्रकरणातील बहुतेक आरोपी हे रिक्षाचालक असल्याचं सांगण्यात आलं आहे.या घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की सोलापूर-विजापूर रोडवरील एका मंदिराजवळ एक अल्पवयीन मुलगी रडत बसली होती.त्यावरून शहरातील एका सुज्ञ नागरिकांने जवळ असलेल्या पोलिस ठाण्याला फोन करून ही माहिती दिली. पोलिसांनीही घटनास्थळी जाऊन मुलीस विश्वासात घेतले आणि रडण्याबाबत विचारणा केली.तेव्हा तिने बलात्कार झाला असल्याची माहिती पोलिसांना सांगितली.पोलिसांनी तिला आधार देत विश्वासात घेऊन आणखी विचारणा केली असता तिने घडलेली हकीकत पोलिसांना दिली आणि मती गुंग करेल अशी घटना उघडकीस आली.
सुरुवातीला एका तरुणाबरोबर या पीडित मुलीचे प्रेम संबंध होते.त्या तरुणाचे इतर सर्व आरोपी मित्र असल्याचे समोर आले आहे.मुलीस वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आला कधी गाडी मध्ये,कधी लॉजमध्ये, कधी शेतामध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन बलात्कार करण्यात आलेला आहे.एका दिवशी तर चौघांनी आळीपाळीने तिच्यावर बलात्कार केला असल्याच समोर आलं आहे.पीडित मुलगी ज्या शाळेत जाते त्या मार्गावर हे संशयित आरोपी प्रवासी वाहतूक करत असणारे रिक्षाचालक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मंगळवार दिनांक 11 फेब्रुवारी रोजी विजापूर नाका पोलीस ठाणे येथे दहा जणांवर आयपीसी 376 , पोक्सो व ॲट्रॉसिटीचा गुन्हां दाखल करण्यात आला आहे.त्यापैकी पाच आरोपींना अटक केली आहे.न्यायालयात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंह राजपुत यांनी तर आरोपींतर्फे ॲड.राजेंद्र फताटे यांनी काम पाहीले.सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त प्रीती टिपरे या करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *