सामान्य कुटुंबातील निसार बनला मंत्रालयीन अधिकारी…!
अकलुज /प्रतिनिधी
शंकरनगर ता.माळशिरस येथील सामान्य कुटुंबातील व ऊसतोड मजुराच्या मुलाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या मंत्रालयीन सह.कक्षअधिकारी परीक्षेत यश संपादन करुन सहा,कक्षअधिकारी पदी झेप घेतली आहे.
निसार मुसा पठाण यांचे मुळ गाव बीड जिल्ह्यातील धामणगाव आहे.मुलांच्या शिक्षणासाठी त्यांचे आई-वडीलांनी अकलुजच्या सहकार महर्षि कारखान्यात ऊसतोड मजुरी करुन ऊदर निर्वाह केला.वडील मुसा पठाण यांनी प्रसंगी हमालीही केली.पण मुलांना शिक्षणापासुन वंचीत ठेवले नाही.निसार हे आपल्या विद्यार्थी दशेत आपल्या कुटुंबातील व्यक्तींचे गरीबीमुळे होणारे हाल अपेष्टा जवळुन पाहत असताना आई-वडीलांनी घामाच्या धारांचे रुपांतर मोत्यामध्ये करायचे असे मनाशी पक्के ठरविले.शालेय व महाविद्यालयीन जिवनात निसार यांनी राष्ट्रीय पातळीवर खेळात अनेकवेळा नेत्रदिपक यश मिळविले होते.
महाविद्यालयीन शिक्षणानंतर निसार पठाण यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरु केला.२०१८ मध्ये त्यांनी सहा.कक्षअधिकारी ,पोलीस उपनिरीक्षक या पदांच्या परीक्षा दिल्या .प्रथम पोलीस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल लागुन त्या परीक्षेत ते ऊत्तीर्ण झाले.त्यांचे पोलीस उपनिरीक्षक पदाचे प्रशिक्षण सुरु असतानाच मंत्रालयीन सहा.कक्षअधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण झाले. अवश्यक सर्व तांत्रिक बाबी पुर्ण करुन त्यांची मंत्रालयात नुकतीच सहा.कक्ष अधिकारी पदी नियुक्ती झाली.त्यांच्या नियुक्तीने शंकरनगर परीसरामध्ये आनंदाचे वातावरण असुन सर्व स्तरातुन निसार यांचेवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
यावेळी निसार पठाण म्हणतात की,आजच्या तरुणांनी कठोर परीश्रांच्यां माध्यमातून आपले कर्तुव सिध्द करायला हवे.परिस्थिती ,गरीबी आपल्या यशाला आडवु शकत नाही पण त्यासाठी आई-वडीलांचे कष्ट डोळ्यांसमोर ठेवुन जिद्दीने ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असते.असे म्हणुन त्याँच्या यशाचे सर्व श्रेय त्यांनी वडील मुसा व आई रेहना पठाण यांना दिले.