पिलीवच्या महालक्ष्मी देवीच्या यात्रेस देवीला अभिषेक घालुन जागावाटपाने प्रारंभ…!
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील महालक्ष्मी देवीच्या यात्रेस श्री.महालक्ष्मी देवीस यात्राकमिटीचे उपाध्यक्ष प्रा.जयवंत बगाडे व माजी जि.प सदस्या सौ.कुसुमताई बगाडे यांच्या हस्ते विधीवत पूजा व अभिषेक घालुन प्रारंभ करण्यात आला.यावेळी पुजारी आण्णा शेंडगे,सागर शेंडगे व यात्राकमिटीचे संचालक मंडळातील सदस्य व भक्तगण उपस्थित होते.यावेळी यात्रा कमिटीचे अध्यक्ष अॅड.गोविंदराव पाटील,उपाध्यक्ष प्रा.जयवंत बगाडे खजिनदार आनंद पाटील,सचिव शिवाजीराव पिसे,संचालक बाबूराव पाटील यांनी व्यावसायिक व दुकानदार व छोट्या स्टॉल धारकांना जागेचे वाटप करुन जागा मागणी प्रमाणे मोजमाप करुन दिली.
पिलीव गावापासून 5 कि.मी अंतरापर्यंत कपने,मदने,मेटकरी,सोलंकर यांची मानाची महालक्ष्मी देवीची पालखी पिलीव पेठेतून वाजत गाजत महालक्ष्मीच्या नावान चांगभलं च्या गजरात मंदिरापर्यंत पोहच करण्यात आली.यावेळी सुहासिनी,देवीभक्त,पोतराज व मानकरी मिरवणूकीत सहभागी झाले होते.तर महालक्ष्मी शिवारातील महालक्ष्मी यूवकांनी श्री.क्षेत्र कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिरापासून पेटती ज्योत पायी चालत आणून देवीस अर्पण करून यात्रेस प्रारंभ करण्यात आला.शेळ्या मेंढ्याचा बाजार सुरू झाल्यानंतर आता मोठ्या देशी खिलार जनावरांची मोठ्या प्रमाणावर विशेषतः लहान लहान खोंडांची व बैलांची आवक होऊ लागली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे

.यात्रा नियोजन बैठकीत ठरलेप्रमाणे मंदिराकडे जाणार्या रस्त्याकडेची काटेरी झाडे झुडपे तोडून खड्डे मुरुम मातीने बुजविलेले दिसतात तर मंदिर परिसरातील धोकादायक विहिरीभोवती काटेरी झाडाच्या फाट्याचे कुंपन केलेचे दिसत आहे तर पोलीस खात्याने मंदिरासमोर टेहाळणी मनोरा (टॉवर) उभारणीची मागणी केली आसून पोलिसबंदोबस्तासाठी राहूटी टाकायचे काम चालू असून देवीच्या दर्शनासाठी महिलांसाठी वेगळी व्यवस्था व महीला पोलिस तैनात केले जाणार आसल्याचे पिलीव औट पोस्टचे पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ महानवर यानी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.तर यात्रा स्थळावर विजवितरण कंपनीच्या वतीने तात्पूर्ते विज कनेक्शन दिले जाणार आसून विजचोरी होऊ नये व अपघात होऊ नयेम्हणून डागडुजी करून यात्रा काळात 24 तास विद्युत पूरवठा चालू ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल आशी माहिती सहायक अभियंता शरद मिसाळ यानी सांगितले.