यंदाच्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अध्यक्षपदी उमेशजी घोंगडे यांची निवड…!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे सन 1960 सालापासून अविरतपणे कार्यरत असलेल्या व स्थापनेपासूनच गुणवत्तेची परंपरा जपत आलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनिअर कॉलेजच्या सन 2019 – 20 या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याच्या अध्यक्षपदी पिलीव गावचे सुपुत्र तथा दैनिक सकाळचे पुणे विभागाचे सहसंपादक उमेशजी घोंगडे यांची निवड करण्यात आली असल्याचे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.लेंडवे एस.डी यांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले. सदरचा कार्यक्रम हा शनिवार दिनांक 8/2/2020 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता विद्यालयाच्या नवीन इमारतीच्या प्रांगणात खालील मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रमुख वक्ते म्हणून श्री.अनिल गुंजाळ,उप आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.विलासराव महाडीक सहसचिव (माध्य.) रयत शिक्षण संस्था,सातारा तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री.संग्रामसिंह जहागिरदार,माजी सभापती तथा सदस्य स्थानिक स्कूल कमिटी,श्री.नामदेवराव जरग,माजी शिक्षण संचालक,महाराष्ट्र राज्य,श्री.संभाजीराव भोसले,सदस्य स्थानिक स्कूल कमिटी,श्री.नारायणराव पाटील सदस्य स्थानिक स्कूल कमिटी तरी सदरच्या कार्यक्रमासाठी पिलीव पंचक्रोशीतील सर्व पालकवर्गांनी,ग्रामस्थांनी व विद्यार्थ्यांनी वेळेत उपस्थित राहावे असे विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.लेंडवे एस.डी व पर्यवेक्षक श्री.गायकवाड एम.के यांनी नम्र आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *