विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माळशिरस वनपरिक्षेत्र अधिकारी शेख साहेब व त्यांच्या टीमचे केले कौतुक…!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील मौजे.तरंगफळ येथील गट नंबर 25 मधील 20 हेक्‍टर क्षेत्रामध्ये 22 हजार दोनशे 20 रोपांची तर मौजे.गारवड येथील गट नंबर 565 मधील 20 हेक्‍टर क्षेत्रामध्ये 27 हजार सातशे 75 रोपांची एक जुलै 2019 रोजी महाराष्ट्र शासनाच्या एक कोटी वृक्ष लागवड या योजनेअंतर्गत माळशिरस तालुक्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी शेख आय.ए.एच यांच्या मार्गदर्शनाखाली लागवड करण्यात आली होती.

सदर वृक्षांच्या लागवडीचा एक जुलै 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते शुभारंभ करण्यात आला होता.ज्या ठिकाणी ऊन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती त्याठिकाणी तेथील रोपांची ऐन उन्हाळ्यात शेख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल,वनरक्षक व कर्मचाऱ्यांनी टँकरने पाणी घालून एक हि रोप जळू न देता त्यांचे संगोपन केले असल्याने आज तीच रोपे पाच ते सात फुटापर्यंत उंच झाली आहेत.त्याच रोपांची पाहणी करण्यासाठी आज माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सवड काढली व आपण उद्घाटन केलेल्या वृक्ष लागवडीचे वनविभागाने कशा प्रकारे संगोपन केले आहे ते पाहण्याचे ठरवले आणि आपला ताफा वळविला तो थेट तरंगफळच्या श्रीनाथ वनराईकडे व त्यानंतर गोरडवाडीच्या बिरोबा वनराईकडे आणि पाहतात तर काय ?

कायम दुष्काळी भागातील माळरानावर पाच ते सात फुटांची हजारो हिरवीगार झाडे आनंदाने डौलत होती.हे सर्व निसर्गरम्य वातावरण पाहून विजयदादांनी वनपरिक्षेत्र अधिकारी शेख आय.ए.एच व त्यांच्या टीमचे तोंडभरून कौतुक केले.वृक्ष लागवड करणे सोपे आहे परंतु त्यांचे संगोपन करणे तितकेच अवघड आहे ते अवघड काम तुम्ही सोपे करून दाखलविले आहे.तुम्ही माझ्या हस्ते झालेल्या वृक्ष लागवडीतील 99 % रोपे जिवंत ठेवली आहेत.भिषण दुष्काळातही त्यांना पाणी कमी पडू दिले नाही म्हणूनच त्यांची आज इतकी वाढ झाली आहे.असे गौरोद्गार काढून विजयदादांनी शेख साहेबांची पाठ थोपटली यावेळी यावेळी वन परिमंडलाधिकारी एस.एम लडकत,एस.सी आगरकर,एस.एस क्षिरसागर,गोरडवाडीचे सरपंच कर्णवर,जोशी,जाधव,गवळी,सौ.गायकवाड मॕडम,वाहन चालक शंकर करे व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *