माजी विद्यार्थी म्हणून मी कर्मवीर विद्यालयाच्या हितासाठी सदैव प्रयत्नशील राहीन – उमेशजी घोंगडे
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व रमेश खलीपे ज्युनिअर कॉलेजच्या सन 2019 – 20 या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्याचे दै.सकाळचे पुणे विभागाचे सह संपादक उमेशजी घोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली आज शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी ठिक 11:00 वाजता आयोजन करण्यात आले होते.यावेळी प्रथमता कर्मवीर आण्णांच्या व लक्ष्मी वहीनींच्या प्रतिमांचे पुजन करुन स्वागत गीताने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

यावेळी विद्यालयाचे मुख्याद्यापक श्री.लेंडवे एस.डी सर यांनी आपल्या प्रस्ताविकातून अतिशय उत्तमरित्या विद्यालयाच्या गुणवत्तेचा उपस्थितांना पाडा वाचून दाखविला व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करुन विविध क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिक वितरित करण्यात आले.त्यानंतर माजी सभापती तथा स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री.संग्रामसिंह जहागिरदार,श्री.विलासराव महाडीक सहसचिव (माध्य.) रयत शिक्षण संस्था सातारा,श्री.नामदेवराव जरग,माजी शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य,श्री.अनिल गुंजाळ,उप आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.यानंतर अध्यक्षीय भाषणातून उमेश घोगडे यांनी सांगितले कि मी या पिलीव गावचा नागरिक असून या विद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे.मी या विद्यालयाचे काहीतरी देणे लागतो म्हणून मुख्याद्यापक श्री.लेंडवे सरांनी विद्यालयाच्या हिताचे मला कोणतेही काम सांगावे त्यासाठी मी सदैव तत्पर व प्रयत्नशील राहीन.यावेळी पिलीव गावचे विद्यमान सरपंच नितीन मोहीते,उपसरपंच शमशाद काझी,माजी सरपंच संग्राम पाटील,स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य संभाजी भोसले,ग्रा.पं सदस्य अविनाश जेऊरकर,विजय वेळापूरे,भैय्या जामदार यांसह विद्यालयाचे विविध विषयांचे शिक्षक,शिक्षिका,पालक,ग्रामस्थ,कर्मचारी वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.