सेवानिवृत्त शिक्षकास मारहाण,जातीवाचक शिवीगाळ दोन आरोपींवर भा.द.वी. अँट्रोसिटी अँक्टनुसार गुन्हा दाखल


“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
जवळा नि: ( दि ०३ ) प्रतिनिधी :
भुम तालुक्यातील देवग्रा येथे दि.31 जानेवारी 2020 रोजी सवर्ण समाजातील आरोपी नामे लखन भाऊसाहेब डोके,भाऊसाहेब सुखदेव डोके या दोघांनी सेवानिवृत्त शिक्षक रमेश संतराम गवळी हे मोटारसायकलवर चालले असताना मोटार सायकलला अाल्टो कारगाडी आडवी लावुन दम देऊन जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करुन जिवे मारण्याची धमकी दिल्याने दोन आरोपींविरुंध्द परंडा पोलीसात अँट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर घटणेची अधिक माहिती अशी की रमेश संतराम गवळी रा. देवंग्रा, ता. भुम (ह. मु. बार्शी) हे दि. 31.01.2020 रोजी सायंकाळी 5:30 ते 6.00 वाजण्याच्या सुमारास देवंग्रा-बार्शी रोडलगत असलेल्या झोपडपट्टी येथे मोटारसायकलने जात होते. यावेळी लखन भाउसाहेब डोके, भाउसाहेब सुखदेव डोके दोघे रा. देवंग्रा ता.भुम हे कार क्र. एम.एच. 25 आर 9138 मध्ये आले व रमेश संतराम गवळी यांच्या मोटारसायकल समोर आडवी लावून पुर्वीचा वाद उकरुन काढून जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
म्हणुन रमेश संतराम गवळी यांच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींविरुध्द दि. 01.02.2020 रोजी राञी 10:52 वा. गुरनं 21/2020 कलम 341,323, 504,506 34 सह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कमल 3 (1) (R), 3 (1) (S) ,3(2)(5)A प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
फिर्यादी हे मागासवर्गीय जातीपैकी महार जातीचे आहेत व सेवानिवृत्त शिक्षकसुध्दा आहेत,
अशा वयोव्रध्द शिक्षकास लाथाबुक्यांनी मारहाण करणे हे कृत्य माणुसकीला काळीमा फासणारे व निंदनीय आहे म्हणुन पोलीस निरीक्षक इकबाल सय्यद यांनी
आरोपींना तात्काळ अटक करुन मा.न्यायालयात हजर केले असता पंधरा दिवसांचा एम सी आर देण्यात आला आहे,आरोपींना उस्मानाबाद येथील कारागृहात पाठवण्यात आले आहे अशी माहिती परांडा पोलीस स्टेशनचेे पोलीस उपनिरीक्षक साहेबराव राठोड यांनी दिली,
सदर अँट्रोसिटी गुन्ह्याचा पुढील तपास भुम येथील वरीष्ठ उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल के.खांबे हे करीत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *