जवळा नि येथील प्राथमिक आरोग्य केद्रांत रुग्ण कल्याण समितीची बैठक सपन्न.


“””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””””
प्रतिनिधी:आजिनाथ राऊत

परंडा तालुक्यातील जवळा नि येथे दि 3 फैब्रुवारी 2020 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण कल्याण समितीची बैठक सपन्न, समितीच्या बैठकीत सचिवांनी मागील बैठकीच्या इतिवृत्ताचे वाचन करुन सर्वानुमते कायम केले व जुन्या इमारतींची दुरुस्ती करणे, सीसीटीव्ही बसवणे यासह विविध विषयावर ठराव घेण्यात आले,
याबाबत अधिक माहिती जवळा नि येथील प्राथमिक आरोग केंद्रात सर्व आजार घेऊन येणाऱ्या रुग्णांना गोळ्या औषधासह शासनाने दिलेल्या सर्व सुविधांचा लाभ घेता यावा,रुग्णांमध्ये जनजागृती होऊन सरकारी दवाखाण्यात उपचार केल्याचे फायदे व महत्व समजावे,रुग्णांचा सरकारी दवाखाण्यात उपचार करण्यासाठी येण्याचा कल वाढावा यासाठी कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंखे यांनी ओपीडी वाढवुन सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या तसेच सरकारी दवाखाना परीसरात सिसीटीव्ही कँमेरे बसवण्याचा तसेच पडझड झालेल्या नादुरुस्त इमारतीच्या दुरुस्तीचा ठराव घेण्यात आला तसेच ओपीडी केस पेपर छपाई, साडी चोळी दुपटे खरेदी, रुग्णालयीन साहित्य खरेदी, औषधी मेडिसिन खरेदी, लॅबोरेटरी तपासणी, मोफत आहार योजना, संदर्भ सेवा, वाँटर कूलिंग खरेदी, रेकॉर्ड कींपिंग मानधन, परिसर स्वच्छता,सोबतच विद्युत दुरुस्ती, सेटिंग दुरुस्ती,(वॉटर पुर्फुीग (रेन हाँर्व्हेस्टींग),उपकरणे दुरुस्ती,स्टेशनरी खरेदी,पडदे खरेदी,बागबगीचा साफसफाई,कपाट खरेदी,टाँयलेट ब्लाँकेंल दुरुस्ती,संगणक प्रिंटर दुरुस्ती यासह विविध विषयावर चर्चा करुन सर्वानुमते ठराव पारीत करुन बैठक सपन्न झाली. सदर बैठक रुग्ण कल्याण समिती अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्ता साळुंखे यांचे उपस्थितीत घेण्यात आली तसेच विविध नियोजित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य,तालुका आरोग्य अधिकारी जाहुर सय्यद,वैद्यकीय अधिकारी डाँ.अतुल घोगरे, सरपंच विद्याताई चौधरी,नवजीवन चौधरी,उपसरपंच अशोक गवारे,ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच राष्ट्रीय दलीत न्याय हक्क आंदोलन संघटना जिल्हाध्यक्ष आजिनाथ राऊत, युवा सेना तालुका प्रमुख परसू गवारे, तानाजी वाघमारे,बळीराम गवारे,भाऊसाहेब गवारे,पंडीत राऊत,विकास निकम,संजय ठाकुर,शशिकांत लटके,आण्णा तनपुरे,समाधान डमरे,पाडुरंग चोबे,तसेच आरोग्य केंद्रातील सर्व डाँक्टर्स स्टाफ व कर्मचारी,आरोग्य सेवक-सेविका,अंगणवाडी सेविका,तसेच गावातील ग्रामस्त उपस्थित होते,यावेळी आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक बलभिम हावळे यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा हार, पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *