करोना व्हायरस माळशिरस तालुक्यात आल्याची अफवा : घाबरु नका परंतु काळजी घ्या – डॉ.रामचंद्र मोहीते

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.रामचंद्र मोहीते यांनी जाहीर निवेदन केले आहे कि संशयित करोना व्हायरसच्या रुग्णाबाबत जी बातमी पसरवली जात आहे ती चुकीची व खोटी आहे.मी स्वतः संबंधित रुग्णालयाशी संपर्क करून माहिती घेतली असता असा कोणताही संशयित रुग्ण या रुग्णालयांमध्ये दाखल झालेला नाही असे तेथील संचालकांनी कळवले आहे.तरी जनतेने घाबरण्याचे काही कारण नाही अशा पद्धतीचा संशयित रुग्ण आपल्या तालुक्यामध्ये कोठेही आढळून आलेला नाही.

त्यामुळे सर्वांनी निशंक रहावे.व कोणीही सोशल मिडीयावरती अफवा पसरवून तालुक्यातील जनतेमध्ये घबराहटीचे वातावरण करु नये अशी विनंती केली असून काही शंका असल्यास उपजिल्हा रुग्णालय अकलूज, ग्रामीण रुग्णालय नातेपुते, ग्रामीण रुग्णालय माळशिरस किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करावा असे माळशिरस टाईम्समच्या माध्यमातून तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.मोहीते यांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *