अट्रासिटी गुन्हे बाबत सी आय डी चौकशी करण्याची पत्रकार सुरक्षा समितीची मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
सोलापूर /अक्कलकोट येथील स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ चे अध्यक्ष जन्मनजेय भोसले व अमोल भोसले यांच्यावर खोटे सूडबुद्धीने व बदनामी करण्याच्या हेतूने एका शिक्षकाने जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून अट्रासिटी चा खोटा गुन्हा दाखल केला आहे या गुन्ह्यांची राज्य गुप्तचर विभागाच्या वतीने सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे
अक्कलकोट च्या पोलीस अधिकारी यांनी या बाबत सखोल चौकशी न करता व घटनेचा योग्य तपास न करता गुन्हा दाखल केला आहे सदर ची बाब गंभीर असून या बाबत पत्रकार सुरक्षा समिती रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार यांनी यावेळी दिला
सदरचे निवेदन सोलापूर चे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे
यावेळी राजेंद्र पवार, वैजिनाथ बिराजदार, अक्की बबलाद, लक्ष्मण गणपा, शब्बीर शेख, अल्ताफ शेख, अभिजित पत्की, दिनेश रेवणकर, प्रसाद ठक्का प्रदीप पेंदापल्लीवार इत्यादी पत्रकार उपस्थित होते