संविधानिक मूल्यांचे आचरण घराघरात व्हावे – राजवैभव शोभा रामचंद्र
सातारा/प्रतिनिधी
संविधान भारतीय लोकांच्या आकाक्षांचे प्रतिबिंब आहे .विषमतावादी संस्कृती नाकारून स्वातंत्र्य ,समता ,बंधुत्व व सामाजिक न्याय या देशात निर्माण करण्याचे स्वप्न पाहणारे माणसाला प्रतिष्ठा देणारे संविधान हे जगात महान आहे. पण भारतीय लोक नुसते प्रतिमेच्या पूजनात रमतात प्रतिमांचे पूजन हे विचारांचे दफन असते म्हणून पुजनाकडून सृजनाकडे आपण जायला हवे संविधानिक मूल्यांचे आचरण घराघरात व्हावे ,असे मत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे युवा कार्यवाह राजवैभव शोभा रामचंद्र यांनी व्यक्त केले.ते येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेज ,सातारा महाविद्यालयात विवेक वाहिनी ,एन .एस .एस व एन .सी सी .व सुगत लर्निंग सेंटर यांनी आयोजित केलेल्या भारतीय संविधान संवाद कार्यशाळेत बोलत होते .अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ .अनिसा मुजावर या होत्या.तसेच महाराष्ट्र अनिस चे उदय चव्हाण ,सुगत लर्निंग सेन्टरच्या संचालिका सोनम पवार इत्यादीची उपस्थिती होती .
संविधानिक मूल्यांचे हनन आपण रोज करीत असतो हे दाखवून देताना ते म्हणाले की ,घरातील स्त्रियांना त्यांचे हक्क न देणे .शेतमजूर स्त्रीला पुरुषाच्या बरोबरीची मजुरी न देणे ,लिंग विषमता मानणे ,जात ,धर्म वरून श्रेष्ठ कनिष्टता पाळणे हे योग्य नाही .संविधान प्रास्तविका एक वाक्याची असून देखील ती जगात महत्वाची ठरली आहे . भारताच्या अगोदर अमेरिकेत लोकशाही होती ,पण त्यांनी अद्यापही आपल्या राष्ट्राचे अध्यक्ष स्त्रीला केलेले नाही ,त्या मानाने भारताच्या लोकशाहीचा प्रवास अवघा ७० वर्षाचा असूनही इंदिरा गांधी यांना पंतप्रधान केले ,तसेच प्रतिभाताई पाटील यांना राष्ट्रपती केले .आपला देश हा सार्वभौम लोकशाही गणराज्य असून धर्मनिरपेक्षता व समाजवाद या मूल्यांमुळे आणखी खुलेपणा जगण्यास आला आहे .संविधानाच्या पुस्तकास हार न घालता त्याच हाराच्या ऐवजी विद्यार्थ्यांना पुस्तके द्यायला हवी असे ते म्हणाले .आपण सर्वांनी विषमतेची मुळे शोधून समतेचा आग्रह धरला पाहिजे .समतेच्या लढाया या विचारांच्या आधाराने करावयाच्या असतात .देश संविधान हे भारताचा प्राण आहे .संविधानामुळेच लोक देशाचे मालक झाले आहेत .घराचा मालक घर अस्वछ ठेवीत नाही.घरात बाहेरचा कचरा आणून टाकत नाही,वा घरातल्या संपत्तीचे नुकसान करीत नाही .आपल्या घराची काळजी घेता तशी देशाची काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले .भारुड ,गौळणी ,अभंग ,प्रबोधन गीते गाऊन सोप्या भाषेत संविधान समजावून त्यांनी सांगितले .
उपप्राचार्य डॉ .अनिसा मुजावर म्हणाल्या की ,राजवैभव शोभा रामचंद्र यांचे संविधान सोप्या भाषेत सांगण्याचे प्रयत्न खूप प्रभावित करतात .शैक्षणिक व्यवस्थेची सारी तंत्रे जणू त्यांनी समजून घेतली आहेत .संविधान सारखे किचकट पुस्तक विद्यार्थ्यांशी एकरूप होऊन त्यांनी सांगितले आहे .डॉ .दाभोलकर यांचा विवेकशील वारसा घेऊन समाजाला संविधान समजून सांगण्याचे त्यांचे प्रयत्न ज्या त्या परिसरात लोकांना जागृत ,देशप्रेमी बनवतील ,असे मत त्यांनी व्यक्त केले .या कार्य शाळेत ,संजय सोनकांबळे ,प्रणाली सुनील मोरे ,नवनाथ सांवंत ,जगन्नाथ माने ,सलोनी मुजावर ,सना शेख ,नम्रता प्रभाकर जाधव या विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून प्रतिक्रिया व्यक्त केली .आम्ही स्वातंत्र्य जगलोच नाही ,आम्हाला संविधान समजले नाही हे भारुड राजवैभव यांनी सादर करीत त्यांनी विवेचन केले . विवेक वहिनीचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ .सुभाष वाघमारे यांनी प्रास्ताविक केले.सोनम पोवार यांनी आभार मानले तर.एन सी.सी .लेफ्टनंट प्रा .के .एल .पवार यांनी सूत्रसंचालन केले .या कार्यशाळेस एन.एस.एस .एन.सी.सी .विवेक वाहिनी चे विद्यार्थी व प्राध्यापक हजर होते .