माळशिरस वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये हुतात्मादिन साजरा…!
पिलीव/सुजित सातपुते
भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरनार्थ आदर व्यक्त करण्यासाठी आज गुरुवार दिनांक 30 जानेवारी रोजी माळशिरस वनपरिक्षेत्र कार्यालयामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी आय.ए.एच शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी 11 वाजता दोन मिनिटे मौन(स्तब्धता)पाळून हा दिवस हुतात्मा दिन म्हणून पाळण्यात आला.यावेळी वन परिमंडलाधिकारी एस.एम लडकत,एस.जी आगरकर,डी.बी शिदोडकर,बी.एस बनकर,एस.एन घाडगे,अजय पवार,पठाण साहेब,अर्चना पाटील,शबाना शेख व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
