लवंग गावच्या मंडलाधिकार्याच्या निलंबनासाठी प्रांत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

सोमवारी आत्मदहन करण्याचा दिला इशारा…!

पिलीव/सुजित सातपुते
मार्च 2019 पासून माननीय मुख्यमंत्री साहेब यांचा स्थानिक चौकशी आदेश व माननीय जिल्हाधिकारी यांचा स्थानिक चौकशी अहवाल गेल्या चार महिन्यांपासून न पाठवता तसाच स्वतःकडे राखून ठेवला असल्याने कामात विलंब केल्याप्रकरणी लवंग गावचे मंडलाधिकारी यांचे निलंबन व्हावे या मागणी साठी मौजे लवंग येथील रहीवाशी दात्तात्रय भागवत जाधव हे 26 जानेवारी 2020 रोजी प्रांत कार्यालय अकलूज येथे उपोषणास बसले आहेत.माळशिरस तालुक्यातील मौजे लवंग येथील सौ.विद्यमान ग्रामपंचायत सदस्या यांचे विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 चे पोटकलम 14 (1) ज – 3 अन्वये या कार्यालयाकडे दिनांक 3/8/2019 रोजी विवाद अर्ज दाखल केला आहे.सदर प्रकरणी दिनांक 23/8/2019 रोजी सुनावणी झाली असून माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी सुनावणी दिवशी जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख सोलापुर,तहसीलदार माळशिरस,गटविकास अधिकारी यांचा अहवाल घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. सुलभ संदर्भासाठी दाखल विवाद अर्जाची प्रत पत्रासह जोडलेली होती.

दत्तात्रय जाधव यांनी दाखल केलेल्या विवाद अर्जाचे अवलोकन करून सौ.विद्यमान सदस्या यांच्याबाबत केलेल्या विवाद अर्जातील मुद्यांच्या अनुषंगाने आपले स्थरावर स्थानिक चौकशी करून आपल्याकडील स्पष्ट अहवाल दिनांक 13/9/ 2019 पर्यंत या कार्यालयास सादर करणेबाबत आपणास वरील संदर्भीय पत्रान्वये कळविण्यात आलेले होते.तथापि आपला अहवाल अद्याप या कार्यालयास अप्राप्त आहे.सदरचे स्मरणपत्र मिळताच तात्काळ उलटटपाली परिपूर्ण अहवाल या कार्यालयास सादर करावा यात विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी.

अशा अशयाचे जिल्हा अधिकारी कार्यालयाकडून संबधित विभागांना पत्र मिळाले आहे तरीही जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत अद्यापही संबंधितांनी अहवाल सादर केला नाही.त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसात मला न्याय मिळाला नाही तर मी येत्या सोमवारी म्हणजेच लोकशाही दिनादिवशी आत्मदहन करणार असल्याचा जाधव यांनी इशारा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *