७ फेब्रुवारी पासून टेंभुंर्णी फेस्टीव्ह सुरु : भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन – संतोष वाघमारे

प्रतिनिधी l टेंभुर्णी
बहुजन प्रतिष्ठाण व फेस्टीव्हल कमिटी टेंभुर्णी यांचे वतीने आयोजित करण्यात आलेल्या टेंभुर्णी फेस्टीव्हल २०२० या सांस्कृतिक महोत्सवास ७ फेब्रुवारी पासून प्रारंभ होत असून यानिमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती फेस्टीव्हलचे आध्यक्ष संतोष वाघमारे यांनी दिली.


फेस्टीव्हलचे यंदाचे सलग १६ वे वर्ष असून ७ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी २०२० या आठ दिवसाच्या कालावधीत कुर्डुवाडी रोडलगतच्या मोकळ्या मैदानात मनोरंंजनाबारोबर विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच मनोरंजनासाठी लहानथोरांना अकाशपाळणा, ब्रेकडान्स, सॕलेम्बो, मौत का कुवा, ड्र्गन, बाउंन्सी, मिनीट्रेन, टोराटोरा. आदी मोठमोठी मनोरंजनासाठी साधने उभारली जाणार आहेत. तसेच महिलांना खरेदीसाठी, इमिटेशन, खेळणी, कपडे, शोभेच्या वस्तुचे स्टॉल्स तसेच विविध कंपन्यांची उत्पादने, कृषी, औद्योगिक, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रीक वस्तू व तंत्रज्ञानाचा अधारित वस्तूंचे प्रदर्शन व खवय्यासाठी पिज्जा ,चायनिज, पावभाजी, दमबिंर्याणी, मंचुरियन, भेळपुरी, पाणीपुरी, रगडापुरी यासारखे आनेक पदार्थांचे स्टाल आहेत. तसेच
दि.७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६. ३० वाजता महोत्सवाची दिमाखदार उद्घाटनाने सुरुवात होईल. भजनी मंडळाचे भजन संध्या हा अध्यात्मिक कार्यक्रम होईल. दांडपट्टा, कसरती, मर्दानी खेळप्रकारांचे प्रदर्शन, खुल्या एकेरी डान्स स्पर्धा, ग्रुप डान्स, गायन स्पर्धा महाराष्ट्राची लोकधारा व मराठमोळ्या लावण्यांचा बहारदार कार्यक्रम याशिवाय फँन्शी ड्रेस, लेझीम, लोककला, मिमीक्री, गायन स्पर्धा, बेटी बचाव अभियान, पर्यावरण रक्षण व स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पोस्टर प्रदर्शन आयोजित केले आहे. यामाध्यमातून समाजप्रबोधन, अंधश्रंद्धा निर्मूलन आणि सामाजिक जाणीवांचा संदेश दिला जाईल. माहितीसाठी ९८९०१०८२१०/९८२२७९८८२५/९०९६४९९०९९ या क्रमांकावर संपर्क करावा. फेस्टीव्हल साठी नागनाथ वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली संस्थापक रघुनाथ वाघमारे, चंद्रकांत कुटे, विकास सुर्वे, योगेश दाखले, सोमनाथ नलवडे, प्रमोद कांबळे, शरपुद्दीन मुलाणी, झुंबर जाधव, सोमनाथ ढावरे, प्रा.विनोद आखाडे, गणेश पोळ, सर्जेराव बुरकुले, सागर कांबळे, दशरथ कसबे, सुनिल जगताप, रोहन जगताप, आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. या सर्व कार्यक्रमांचा टेंभुर्णी शहर व पंचक्रोशीतील रशिकांनी लाभ घ्यावा असे अवाहन फेस्टीव्हल संयोजकाचे वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *