पिलीव बचेरी रस्ता लवकर दुरुस्ती करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार – शिवराज पुकळे
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव-बचेरी या रस्त्यावरुन प्रवास करताना रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी परीस्थीती निर्माण झाली आहे.या रस्त्याला मोठ मोठे खड्डे पडले असुन रस्त्यावरील डांबर नाहीसे होऊन खडी उघडी पडली आहे.या रस्त्यावरुन सद्गुरु श्री श्री साखर कारखान्याची ऊस वाहतुक होत असल्यामुळे रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते त्यामुळे वहानचालकांना वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे छोटे-मोठे अपघात नेहमीच घडत असतात रात्री-अपरात्री मोठा अपघात झाला तर याला जबाबदार कोण,असा सवाल सामान्य नागरीक करत आहेत.तसेच खराब रस्त्यामुळे बचेरी सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थांना शाळा कॉलेजला जाण्यासाठी नेहमीच उशिर होतो त्यामुळे येथील विद्यार्थांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच पिलीव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र,बँका,तसेच आठवडा बाजार भरत असल्यामुळे बचेरी गावातील सरास लोकांचे पिलीवकडे येणे-जाणे असते.त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते पण रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवाशांना जिव मुठीत धरुन या रस्त्यावरुन प्रवास करवा लागत आहे.त्यामुळे येथील नागरीकांनी एखाद्याचा प्राण गेल्यानंतर प्रशासनाला जाग येईल का,असा सवाल युवा नेते शिवराज पुकळे यांनी उपस्थीत केला आहे.संबंधीत खात्याने जातीने लक्ष घालून लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा संबधित अधिकार्यांच्या कार्यालयापुढे तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा शिवराज पुकळे यांनी इशारा दिला आहे.
