गारवाड शाळेचे स्नेहसंमेलन जल्लोषात संपन्न…!
पिलीव/सुजित सातपुते
दरवर्षी प्रमाणे जि.प.शाळा गारवाड केंद्र -चांदापुरी, ता.माळशिरस येथील स्नेहसंमेलन सोमवार दि.27/01/2020 रोजी वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व पालकांच्या उदंड प्रतिसादात मोठ्या उत्साहात संपन्न् झाले.सदर कार्यक्रमाचे उदघाटन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री भारत मगर व माजी अध्यक्ष दिपक पवार यांचे हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास माळशिरस पंचायत समितीच्या सभापती सौ.शोभाताई सुनिल साठे व केंद्रप्रमुख प्रकाश तोरणे सर यांनी उपस्थिती लावून मुलांच्या कलागुणांना दाद दिली.
सदर कार्यक्रमामध्ये शाळेच्या मुलांनी मराठी,हिंदी गीतावरती बहारदार अशी नृत्ये सादर करून उपस्थित रसिकांची दाद मिळवली. विद्यार्थ्यांची गीते व नाटिका शाळेतील शिक्षकांनी बसवून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कोल्हटकर सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक मुजावर सर,सुरवसे सर,सय्यद सर,सोनवणे सर,तोरणे सर,मळ्ळी सर व मुख्याध्यापक सुळ सर व गावातील तरूण मंडळांच्या युवकांनी प्रयत्न केले.