माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी सालारखान पठाण यांची निवड…!
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील सालारखान पठाण यांची राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाच्या माळशिरस तालुकाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.सोलापुर येथे रंगभवन या ठिकाणी सोलापुर जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या हस्ते निवडीचे पत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली.गोर-गरिब व गरजू लोकांपर्यंत शासकीय योजना पोहचवून त्यांना लाभ मिळवून देणे,सामान्य जनतेच्या विवीध समस्यांचे निवारण करण्याचा प्रयत्न करणे व विवीध सामाजिक उपक्रम राबविणे यातूनच आपली ओळख निर्माण करणार्या सालारखान यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून उत्तमराव जानकर यांनी सालारखानला त्यांच्या कार्याची पोच पावती म्हणून अध्यक्षपद दिले आहे.सदरच्या निवडीबद्दल सालारखान यांचे विवीध स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे.मी उत्तमराव जानकर साहेब व माझे काका अरिफखान पठाण यांच्या पाऊलावर पाऊल टाकत चळवळीत काम करत आहे व त्यांच्याच मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यामध्ये गाव तेथे शाखा हा उपक्रम राबवून पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे सालारखान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.