चैतन्य देशमुखच्या श्री.समर्थ मिल्कचा पिलीव परिसरामध्ये सर्वात उच्चांकी दर…!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील अवघ्या 23 वर्षीय चैतन्य महेश देशमुख या तरुणाने गेल्या तीन वर्षांपूर्वी पिलीव-पंढरपूर रोड लगत कुसमोड हद्दीत श्री.समर्थ मिल्क ॲन्ड ॲग्रो प्रॉडक्टस् या नावाने स्वतःच्या हिंमतीवर एक दूध शीतकरण केंद्र सुरू केले व तेच शीतकरण केंद्र आज बघता बघता नावारूपाला आले व सबंध माळशिरस तालुक्यात चैतन्य देशमुखचे चेअरमन म्हणून नावलौकिक झाली.याचे कारण आहे ते म्हणजे माळशिरस तालुक्यातील पिलीव परिसरामध्ये लहान-मोठी पकडली तर एकूण 16 शीतकरण केंद्र आहेत.त्यामध्ये चैतन्य देशमुख यांचे श्री.समर्थ मिल्क ॲन्ड ॲग्रो प्रॉडक्टस् हे एकमेव शीतकरण केंद्र आहे की दूध उत्पादक शेतकऱ्यांना सर्वात उच्चांकी म्हणजे प्रति लिटर 34.50 रु.दर देते.त्यामुळे अवघ्या तीन वर्षात 2400 लिटर रोज दुधाचा साठा करून पुढे पारस दूध संघ नेवासा व सह्याद्री दूध संघ बारामती येथे पाठविले जाते.

सर्वांपेक्षा ज्यादा दर मिळत असल्याने श्री.समर्थ मिल्ककडे दूध उत्पादक शेतकऱ्यांचा कल वाढत असल्याचे पहावयास मिळत आहे व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहर्यावरही एक प्रकारचे समाधान पहावयास मिळत आहे.दूध उत्पादकांना त्यांच्या कामाचा योग्य मोबदला मिळालाच पाहीजे म्हणून मी येत्या 1 फेब्रुवारी 2020 पासून आणखी प्रति एक लिटर माघे 1 रुपया दर वाढवून देणार असल्याचे चेअरमन चैतन्य देशमुख यांनी माळशिरस टाईम्सशी बोलताना सांगितले.अवघ्या 23 व्या वर्षी चैतन्य देशमुख यांनी दूध व्यवसायात यशस्वी होऊन प्रगती केली असल्याने भविष्यात ते माळशिरस तालुक्यातील नामांकित युवा उद्योजक म्हणून ओळखले जातील यात तीळ मात्र शंका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *