गुरु नानक मिशनच्या राज्यस्तरीय खुल्या निबंध स्पर्धेत डॉ.सुभाष वाघमारे प्रथम…!

सातारा दिनांक :१७
श्री गुरु नानक देवजी यांच्या ५५० व्यां जयंती निमित्त गुरु नानक मिशन श्रीरामपूर यांनी आयोजित केलेल्या खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख ,प्रा.डॉ सुभाष वाघमारे यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक जाहीर झाले असून २फेब्रुवारी २०२० रोजी श्रीरामपूर येथील गुरुद्वारा गुरुसिघ सभा दशमेश नगर येथे त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रुपये ५०००,विशेष प्राविण्य प्रमाणपत्र, व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला जाणार आहे .गुरु नानक मिशनच्या संस्थापक,डॉ, कमलजित कौर बात्रा यांनी ही माहिती दिली.डॉ.वाघमारे यांनी “गुरु नानक देवजी यांचा पुरोगामी दृष्टिकोन” हा निबंध सादर केला होता ,या स्पर्धेत खुल्या आणि शालेय स्तर गटात मिळून २०८निबंध आले होते.

या त्यांच्या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे
सचिव व छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य,डॉ.भाऊसाहेब कराळे,उपप्राचार्य डॉ.सौ.अनिसा मुजावर यांनी अभिनंदन केले. याच खुल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक,प्रा.राजेंद्र रामभाऊ काळे, वरुर खुर्द,सौ,नरेंद्र कौर छाबडा, औरंगाबाद यांना विभागून जाहीर आहे,तर,तिसरा,क्रमांक देखील डॉ.सौ मोक्षदा सागर पटेल,श्रीरामपूर, व सौ शीतल विशाल निभोरे , वडाळा महादेव,यांना विभागून जाहीर झाला आहे,श्रीमती झाईदा इनामदार शिर्डी,श्री प्रतीक संजय निकम, भेंडा,श्री नीलराज विलास डोखे,केसापुर,कु,दिपाली अशोक रोडे,यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे .गुरुनानक मिशनच्या स्पर्धा संयोजन समितीने प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचे अभिनंदन केले.या स्पर्धेत सहभागी झालेल्या संतोष शेळके या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचाही यावेळी सन्मान केला जाणार आहे
याच खुल्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक,प्रा.राजेंद्र रामभाऊ काळे, वरुर खुर्द,सौ,नरेंद्र कौर छाबडा, औरंगाबाद यांना विभागून जाहीर आहे,तर,तिसरा,क्रमांक देखील डॉ.सौ मोक्षदा सागर पटेल,श्रीरामपूर, व सौ शीतल विशाल निभोरे , वडाळा महादेव,यांना विभागून जाहीर झाला आहे,श्रीमती झाईदा इनामदार शिर्डी,श्री. प्रतीक संजय निकम, भेंडा,श्री. नीलराज विलास डोखे,केसापुर,कु.दिपाली अशोक रोडे,यांना उत्तेजनार्थ पारितोषिक जाहीर झाले आहे,खुल्या निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा डॉ.अशोक कामत ,विभाग प्रमुख ,संत नामदेव अध्यासन,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे,प्रा.डॉ.शिवाजीराव काळे राहता, व डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी काम पाहिले .गुरुनानक मिशनच्या स्पर्धा संयोजन समितीने प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांचे अभिनंदन केले.
गुरुनानक मिशनच्या
डॉ. कुलवंतसिंग बत्रा ,श्री.रवींद्र गुलाटी, गुरुबचनसिंग चुग,राजन आहुजा,राजेश अलग, जगजितसिंग चुग या मान्यवरांनी या कार्यक्रमास,सर्व,स्पर्धकांनी उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *