माझे दैवत वैभवजी गीतेसाहेब मला भेटायला आले – श्रावण उदागे
मी श्रावण अंकुश उदागे रा चिंचवड पुणे ,माझा मोठा भाऊ माणिक अंकुश उदागे याने. मोरेवस्ती चिखली येथे दिनांक 14 एप्रिल 2014 रोजी- महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संविधान प्रतिष्ठान च्या माध्यमातून जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली होती, याचा राग मनात धरून मोरेवस्ती चिखली येथील जातीयवादी गावगुंडानी दिनांक 01 मे 2014 रोजी पहाटे 3 च्या सुमारास आमच्या राहत्या घरातून या माझ्या मोठया भावाचे अपहरण करून मोशी दगड खान येथे नेऊन त्याचा खून केला. याबाबत एम.आय.डी.सी.भोसरी पोलीस ठाण्यात अट्रोसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्या भावाचा खून झाल्यामुळे माझ्या कुटुंबाची सर्व जबाबदारी माझ्यावरती आली या घटनेनंतर आमचे सांत्वन करण्यासाठी अनेक सत्ताधारी, विरोधी गटाचे नेते येऊन मला शासकीय सेवेत सामावून घेऊ असे आश्वासन दिले परंतु कोणीही आमची दखल घेतली नाही नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस संघटनेचे राज्य महासचिव Dr.केवलजी उके साहेब व राज्य सचिव वैभव तानाजी गिते यांनी शिष्टमंडळासह घटनास्थळी भेट दिली मला शासकीय नोकरी मिळावी म्हणून नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस (NDMJ)या संघटनेने मला विनामूल्य मदत केली
या संघटनेने मला सरकारी नोकरी मिळावी म्हणून 5 वर्षे 1 महिना अक्षरशः जिवाचे रान केले
मला नोकरी मिळावी म्हणून माझ्या साठी संघर्ष केला पाठपुरावा करत असताना वैभव गीते साहेबांना व मला कधी रेल्वे स्टेशनवर तर कधी समुद्राच्या किनारी मुक्काम करावा लागला कधीकधी शिळ्या भाकरीचे तुकडे खावे लागले,कधीकधी उपाशी झोपावे लागले माझ्या भावाचा खून होऊन पाच वर्ष एक महिना झाला माझ्या मोठ्या भावाची कमी मला मा.वैभव गीते साहेबांनी होऊ दिली नाही स्वतःच्या कुटुंबाची स्वतःच्या जीवाची परवा न करता जातीय अत्याचारात उध्वस्त झालेल्या कुटुंबांचे पुनर्वसन करणारा धाडसी,जिद्दी,आक्रमक व अभ्यासू नेते म्हणजे वैभव गीते होय*
दिनांक 4 जून 2019 रोजी मला शासकीय सेवेत सामावून घेण्यात आल्याचे आदेश समाज कल्याण अधिकारी पुणे यांनी दिले मी सर्वप्रथम मा.वैभव गीते साहेबांना हे सांगितले असता साहेबांनी मला पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या जे मिळाले आहे ते टिकव मोठ्या भावाच्या नंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तुझ्यावर आहे आई-वडील लहान भावाला कधीही विसरू नकोस केस संपेपर्यंतच नव्हे तर आयुष्यभर तुला आमची साथ असेल हे गीते साहेबांचे शब्द ऐकताच डोळ्यातून अश्रू येऊ लागले
मला जर कोणी विचारले देव कसा दिसतो तर मी त्यांना सांगेल वैभवजी गीते साहेबांसारखा दिसतो असे मी सांगेन
आज मी जेथे काम करतो ते ठिकाण दिवे निवासी शाळा येथे माझे दैवत वैभवजी गिते साहेब,अजिनाथ राऊत व रवी झेंडे यांनी अचानक माझ्या शाळेला भेट दिली शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक स्टाफ यांच्याशी चर्चा केली मला काही अडचणी आहेत का याची चौकशी केली वैभवजी गिते साहेबांच्या रूपाने मला माझा मोठा भाऊ मिळाला आहे
म्हणूनच आज मी सर्वांना सांगत आहे आज माझा देव मला भेटायला आला
आपला श्रावण उदागे
आपला नम्र
शहीद माणिक उदागे यांचा लहान भाऊ श्रावण अंकुश उदागे