सोशल संस्थेच्या वतीने चांदापुरी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अठरा तास अभ्यास अभियान


सोशल ही संस्था समाजातील वंचित व दुर्लक्षित लोकांकरिता गेली दहा वर्षे कार्यरत असून मोफत आरोग्य शिबिरे,दुष्काळी मोफत आरोग्य सेवा, मुले दत्तक योजना,लाडली योजना,शालेय साहित्य मदत,महिला व ग्रामविकास इ उपक्रम अविरतपणे सुरू आहेत.
महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सालाबादप्रमाणे या वर्षी ही संस्थेने सलग अठरा तास अभ्यास अभियान राबवले.या वेळी सुरुवातीस प्रतिमेचे पूजन रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष विकास धाइंजे,भटक्या समाजाचे नेते मारुती सरगर ,सोशल चे अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले
यावेळी मनोगत व्यक्त करताना विकास धाइंजे म्हणाले असे अभियान च्या माध्यमातून उच्च पदस्थ अधिकारी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत.सर्व बहुजन समाजातील मुले आणि विशेषतः मुलींची संख्या लक्षणीय आहे अठरा तास अभियान राबवणारी ही सोलापूर जिल्ह्यातील पहिली शाळा असेल व खऱ्या अर्थाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना या पेक्षा वेगळी आदरांजली असूच शकत नाही.डॉ.पंचशीला लोंढे,डॉ.कुमार लोंढे,प्रा.कुंडलिक साठे यांनी ही मनोगत व्यक्त केले.
सदर अभियानात पाचवी ते बारावी गारवाड,तरंगफळ, पठाणवस्ती ,चांदापुरी, निमगाव,कुसमोड या परीसरातील शंभर पेक्षा जास्त विद्यार्थिनी सहभाग झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नितीन सरक यांनी केले तर प्रास्तविक स्नेहल उरवने मॅडम केले यावेळी आण्णा भोसले, अरुण बोडरे,महादेव मिसाळ दत्ता सोरटे,प्रा.राम चौगुले,प्रा.दीपक काटे,प्रा.चोरमले,प्रा.अल्ताफ पठाण,डी. जी लोंढे सर,साजिद पठाण सर,कोमल शेटे,अरुणा लोंढे मॅडम, वायदंडे सर,आर्शिद पठाण सर इ नि कार्यक्रम यशस्वी केला तर शेवटी आभार प्रा.धाइंजे सर यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *