पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन
प्रतिनिधी/अकलुज
भारतीय घटनेचे निर्माता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अकलूज येथील पुतळ्याला जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले व पत्रकार किरण भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माळशिरस तालुकाध्यक्ष बॉबी वाघमारे,युवक तालुकाध्यक्ष गुरु गायकवाड,सचिन कांबळे,शिवाजी खडतरे,आनंद भोसले,मयूर माने,भैय्या मोरे,प्रेम नवगिरे यांचेसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते