सद्गुरू श्री श्री साखर कारखान्यामध्ये आठवा ऊस गाळप हंगाम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न
पिलीव/रघुनाथ देवकर: सांगली ,सोलापूर, सातारा जिल्ह्याच्या सरहद्दीवर राजेवाडीच्या माळरानावरती सद्गुरू श्री श्री रविशंकरजी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत शेतकऱ्यांचा मानबिंदू ठरलेल्या व सभासदांच्या विश्वासास पात्र झालेल्या सद्गुरू श्री श्री साखर कारखान्याचा आठवा ऊस गाळप हंगामाच्या कार्यक्रमाचे आयोजन कारखान्याचे चेअरमन एन शेषागिरी राव व व्हा.चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री व सौ बाळासाहेब कर्णवर – पाटील (व्हा. चेअरमन) यांचे हस्ते श्रीमहालक्ष्मी यज्ञ व श्री व सौ शरद देवकर यांचे हस्ते श्री सत्यनारायण ची पूजा आणि सद्गुरू श्री श्री रविशंकरजी यांच्या प्रतिमा पूजनाने झाली . शिवाचार्य माढेकर महाराज ,गुरुमुक्तेश्वर महाराज वेळापूर, माळशिरसचे आमदार रामभाऊ सातपुते, चेअरमन एन शेषागिरी राव,व्हा चेअरमन बाळासाहेब कर्णवर पाटील,संचालक गणेशदादा हाके,मोहनआप्पा बागल, सतिश दडस,संचालिका उषाताई मारकड,जनरल मॅनेजर नागेश राव,सी एफ ओ रोहीत नारा, सी ई ओ अण्णासाहेब शेंडे व अनेक मान्यवरांच्या हस्ते काटापूजन करून मोळी टाकण्यात आली.सदर कार्यक्रमाचे पौरोहित्य कापरे गुरुजी यांनी केले तर सभेला सुरुवात करण्यापूर्वी दीपप्रज्वलन करून इटकी विद्यालय इटकी च्या विद्यार्थिनी नी पाहुण्यांचे स्वागत गीत गाऊन कार्यक्रमास सुरुवात केली. सभेचे अध्यक्षस्थान एन शेषागिरी राव यांनी स्वीकारले तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार रामभाऊ सातपुते लाभले होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात व्हॉइस चेअर मॅन बाळासाहेब कर्णवर पाटील म्हणाले की, या करखान्यावरती आपणा सर्वांच्या सहकार्याने गोशाळेच्या माध्यमातून गोकुळ निर्माण करणार व या भागातील मुलामुलींना चांगले शिक्षण मिळावे म्हणून शिक्षण संस्था निर्माण करणार आहे. कारखान्याचा सभासद हा मालक आहे गेल्यावर्षी 5लाख 49हजार मेट्रिक टन उसाचे गाळप केले लवकरच इथेनॉल प्रकल्प पूर्ण होत आहे.शेतकऱ्यांनी आपला ऊस सद्गुरू कारखान्याला द्यावा शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाप्रमाणे सर्व पैसे दिलेले आहेत त्याबरोबर च मिलीटरी स्कूल ,बारा ज्योतिर्लिंग मंदीर होणार आहे.आमदार राम सातपुतेनी कारखान्याची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. गणेश दादा हाके यांनी आपल्या भाषणात राज्यातील बऱ्याच कारखान्यांना गाळप परवाने मिळत नसून आपण एफ आर पी प्रमाणे दर देत असल्याने आपल्याला गाळप परवाना मिळाला आहे कारखाना उत्तम प्रकारे चालण्यासाठी आम्ही संचालक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी ष. ब्र. माढेकर महाराज व मुक्तेश्वर महाराजांनी आपल्या आशीर्वचनातून शुभेच्छा दिल्या. चेअरमन एन शेषागिरी राव म्हणाले की गुरुजींचे प्रेम आणि शेतकऱ्यांची साथ यामुळे कारखाना यशस्वीपणे चालत आहे.शेतकरी खूष राहण्याची जबाबदारी आमची राहणार आहे.सदर प्रसंगी सिद्धाराम माशाळे, किरण पाटील ,संजय केंदळे, नानासाहेब कर्णवर पाटील राजेवाडी चे सरपंच कोडलकर, इटकी चे सरपंच करचे, पिलीवचे सरपंच नितीन मोहिते, लहुजी संघटनेचे सागर लोखंडे, पत्रकार संजय देशमुख, प्रा संजय पाटील, शाहरूख मुलाणी, माळशिरस टाईम्स चे संपादक सुजीत सातपुते ,त्याचप्रमाणे महिला बचतगटाच्या पिलीव परिसरातील सदस्या ,वामने,कौस्तुभ प्रभुणे, शहाजी पाटील, वर्क्स मॅनेजर जाधव सो,एच आर अडमिंन चे समीर सय्यद, सचिन खटके, तानाजी देवकाते, अवधूत जमदाडे, सुरक्षा अधिकारी बोडरे, सर्व खाते प्रमुख, कर्मचारी ,कामगार व सांगली सोलापूर सातारा जिल्ह्यातील सभासद, वाहन मालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेतकी अधिकारी सुनील सावंत व रघुनाथ देवकर यांनी केले.आभार अण्णासाहेब शेंडे यांनी मानले.कार्यक्रमानंतर स्नेहभोजन देण्यात आले.