जिल्हा परिषद शिक्षकांनी सव्वा लाख रूपयांची पर्स परत केली…! पिलीवचे सचिन गाटे [सर] यांचा प्रामाणिकपणा…!
पिलीव/सुजित सातपुते
जग स्वार्थी बनलंय, असे म्हटले जात असले तरी प्रामाणिकपणा सुद्धा तितकाच शिल्लक आहे. मुलांनी नेहमी प्रामाणिकपणे वागावे अशी शिकवण देणार्या गुरूजींवरच जेंव्हा प्रामाणिकपणाच्या परिक्षेचा प्रसंग येतो तेव्हा …..
अशीच वेळ सोलापूर जिल्हा परिषदेच्या माळशिरस पंचायत समितीत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणार्या सचिन गाटे , नागेश वाघमोडे व अर्जुन बोरकर यांच्यावर आली…
जि.प. शाळेत प्राथमिक शिक्षक म्हणून काम करणारे तीन जिगरी दोस्त सचिन गाटे, नागेश वाघमोडे व अर्जुन बोरकर सर हे तिघेही आपल्या मुलांना भेटण्यासाठी सैनिक स्कूल, सातारा येथे गेले होते तद्नंतर मुलांना घेऊन ते कासपठार रोडच्या दिशेने झाडे पाहून एका मोठ्या झाडाखालच्या सावलीत जेवायला बसले. काही वेळानंतर या तीन मित्रांना एका बाजूला एक लेडिज पर्स दिसली. व ती पर्स पाहून सचिन गाटे यांनी आपले पोलीस मित्र संतोष मदने साहेब यांना फोन लावून माहिती दिली तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली पर्समध्ये आधार कार्ड किंवा काही सापडते का ते पाहिलं त्यावरून एका सोने खरेदीच्या पावतीवरील मोबाईल नंबर वरून फोन केला व सौ. उषा चव्हाण मॅडम व त्यांचे पती श्री. दुश्यंत चव्हाण साहेब राहणार दादर, मुंबई यांच्याशी संपर्क करून….
पर्स, पर्समधील सव्वालाख रूपयांची रक्कम इ. प्रामाणिकपणे परत केले
चव्हाण कुटुंबीयांनी गाटे.वाघमोडे व बोरकर कुटुंबीयांचे आभार मानून मुलांना शुभेच्छा दिल्या….!!
या प्रामाणिकपणाबद्दल माळशिरस तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षक, गटशिक्षणाधिकारी मा.श्री. धनंजय देशमुख, नकाते साहेब व पिलीव ग्रामस्थांकडून या शिक्षकांचे कौतुक होत आहे.
◆ अाम्ही दररोज मुलांना प्रामाणिकपणा, संवेदनशिलता यांसारख्या मूल्यांची शिकवण देत असतो. ही मूल्ये अगोदर शिक्षकांच्या अाचरणात असायला हवी तरच ती मुलांमध्ये उतरतील. अाम्ही अामच्या कृतीमधून ह्याचा प्रत्यय दिला. मनोमन समाधान वाटते.
सचिन गाटे
शिक्षक, जि.प.प्रा.शाळा, काळमवाडी