आमदार रामभाऊ सातपुते कीप इट अप- शिवराज पुकळे


       माळशिरस विधानसभा मतदारसंघातून नुकतेच निवडून आलेले आमदार रामभाऊ सातपुते यांनी त्यांच्या वेगळ्या शैलीमध्ये काम चालू केले आहे .अधिकाऱ्यांना तडकाफडकी प्रश्न विचारण्याच्या त्यांच्या या स्टाईल मुळे सध्या त्यांना काही लोक समर्थन देत आहेत ,तर काही लोक विरोध करत आहेत .अशा मध्येच राज्यात भाजप-शिवसेना संघर्ष चालू असताना युवासेना माळशिरस तालुका विधानसभा प्रमुख शिवराज पुकळे यांनी मात्र भाजपचे नूतन आमदार रामभाऊ सातपुते यांची पाठराखण केली आहे.
                  त्यांनी असे म्हटले आहे आज पर्यंत माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील गटाचाच आमदार निवडून आलेला आहे.यावेळी मोहिते-पाटील  विरोधी गटाचे उत्तमराव जानकर यांचा निसटता पराभव झालेला आहे. तालुक्यातील मोहिते पाटील विरोधकांनी उत्तमराव जानकर यांच्या विजयासाठी मोठी ताकत लावली होती .परंतु निवडणूक झाल्यानंतर विरोधाला विरोध म्हणून राम सातपुते यांना विरोध करणे चुकीचे आहे ,कारण आपला विरोध हा राम सातपुते यांना नसून मोहिते-पाटील यांना होता. त्यामुळे मोहिते-पाटील यांनी सांगेल तसेच वागनारे आमदार कै.हनुमंतराव डोळस साहेब यांचा कार्यकाळ आपण बघितलेला आहे. तेव्हा मात्र आपण सर्वांनीच तालुक्यातील मोहिते-पाटील विरोधी गटाने नेहमीच त्यांना वेगवेगळ्या उपमा देऊन ट्रोल केले होते. मग आता नव्या उमेदीचा आमदार जर लोकांसाठी प्रशासनातील लोकांना ज्यांच्यावर कोणत्याही नेत्याचा वचक राहिलेला नाही अशा अधिकाऱ्यांना वेगळ्या शैलीमध्ये बोलून लोकांची कामे करून घेत असतील, तर आपण त्यांना साथ दिली पाहिजे.
            आपल्याला तालुक्याचा आमदार हा स्वतःच्या मनाने निर्णय घेणारा आणि लोकांसाठी काम करणारा पाहिजे. त्यामुळे निवडणुकींमधील विरोध बाजूला सारून आमदार राम सातपुते यांच्या जनतेसाठी सुरू असलेल्या कामाबद्दल युवासेना माळशिरस विधानसभा प्रमुख शिवराज पुकळे यांनी आमदार रामभाऊ कीप इट अप असे म्हटले आहे याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *