पीपल्स रिपब्लिकन पार्टी विधानसभेला सोलापूर जिल्ह्यात तटस्थ


अकलूज:-पीपल्स रिपब्लिकन पार्टी(राष्ट्रिय अध्यक्ष आमदार प्रा.जोगेन्द्रजी कवाडे सर)PRPची सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व विधानसभा निवडणुकीबाबतची महत्वपूर्ण बैठक सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत सोलापूर येथील हॉटेल किनारा येथे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले,सोलापूर शहराध्यक्ष अमित कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.विधानसभा निवडणुकीत पीपल्स रिपब्लिकन पार्टीची काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस सोबत युती आहे परंतू सोलापूर जिल्ह्यात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसने पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकार्यांना आजपर्यंत विश्वासात घेऊन प्रचारात सहभागी करून घेतले नसल्याचे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी या बैठकीत सांगितले व शेवटी पक्ष देईल तो आदेश मान्य असल्याचे सांगितले.यानंतर राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे साहेब,सोलापूर जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले,सोलापूर शहर अध्यक्ष अमित कांबळे यांनी सर्व पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्ह्यातील प्रमुख वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा करून पुढील निर्णय दोन दिवसात घेऊ असे सांगितले…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *