देवानंद गोंजारी यांना राज्यस्तरीय स्नेहबंध कलारत्न सन्मान पूरस्कार जाहीर.
—————————————————————–
पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील न्यू इंग्लीश स्कुल भाळवणीचे कलाशिक्षक देवानंद लक्ष्मण गोंजारी यांना स्वर्गीय हरिश्चंद्र गायकवाड फौंडेशन,बहुउद्देशिय समाजसेवी संस्था व स्नेहबंध वाचनालय भोसे ता.पंढरपूर यांच्यावतीने राज्यस्तरीय कलारत्न सन्मान 2019 चा पूरस्कार त्यांनी केलेल्या प्रेरणा दायी अतुलनीय व समाजोपयोगी बहूमुल्य योगदानाबद्दल जाहीर करण्यात आला आहे. दि.6/10/2019 रोजी सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहामध्ये विशिष्ट मान्यवरांच्या हस्ते समारंभ पूर्वक सदरचा पूरस्कार प्रदान केला जाणार आसल्याची माहिती देवानंद गोंजारी यांनी दिली.त्यांचे भाळवणीचे प्राचार्य गायकवाड पिलीव चे प्राचार्य साहेबराव लेंढवे शिक्षक व ग्रामस्थ पालक यांनी अभिनंदन केले.