माळशिरस तालुक्यातील ५० अतिरिक्त ट्रांसफार्मरला मंजुरी
पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील ओव्हरलोड मुळे जळणार्या ट्रांसफार्मर मुळे शेतकर्यांचे नुकसान होऊ नये म्हणुन ६३ के व्ही डीपी च्या एवजी १०० के व्ही चे २५ डीपी तर, १०० के व्ही डीपी ला नवीन २५ अॅडीशन डीपी करण्याची मागणी उर्जा मंत्र्यांकडे करण्यात आली होती.त्या मागणीला राज्याच्या उर्जामंत्र्यांनी तत्काळ मंजुरी दिली आहे.यामुळे शेतकर्यांना मोठा फायदा होणार असुन ओव्हरलोडींग मुळे ट्रांसफार्मर जळण्याचे प्रमाण कमी होणार आहे,सदर कामाला तत्काळ मंजुरी दिल्याबद्धल राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब,उर्जामंत्री चद्रशेखर बावनकुळे साहेब,यांचे माजी खा. रणजितसिंह मोहिते पाटील यांनी माळशिरस तालुक्याच्यावतीने आभार मानले.