अष्टविनायक मंडळाने अनावश्यक खर्च टाळून जपली सामाजिक बांधिलकी…!

पिलीव/प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील अष्टविनायक गणेश मित्र मंडळ हे गेली 15 ते 20 वर्षापासून दरवर्षी नव्या ढंगात पिलीवकरांच्या मनोरंजनासाठी जिवंत देखावे व विविध कार्यक्रम सादर करत असते.परंतु या वर्षी मंडळाचे सदस्य अमोल अशोक गांधी यांची पत्नी मयुरी गांधी ही लिव्हरच्या अजाराने त्रस्त असल्याने तिच्या उपचारासाठी डॉक्टरांनी 32 लाख रुपये इतका खर्च सांगितला असल्याचे गांभीर्य लक्षात घेवून मंडळाचे संस्थापक अविनाश जेऊरकर व मार्गदर्शक प्रकाश जाधव यांनी मंडळातील सर्व सदस्यांची बैठक घेतली.व या वर्षी आपण अनावश्यक खर्च टाळून साध्या पध्दतीने गणपती विसर्जन करुन मयुरी गांधी यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत करु असे सांगितले यावर सर्वांनी सामाजिक बांधिलकी म्हणून या कामासाठी एकमताने होकार दिला व बघता-बघता 1 लाख 50 हजार रुपये एवढी रक्कम दोन दिवसात जमा झाली व ती सर्व रक्कम अमोल गांधी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.त्यामुळे दरवर्षी हजारो प्रेक्षेकांना मनोरंजनाची खैरात देणार्या मंडळाच्या स्टेजवर यावर्षी शूकशुकाट होता परंतु तरीही अष्टविनायक गणेश मित्र मंडळाचाच मोठेपणा असे पिलीवकरांमध्ये चर्चिले जात आहे.

अष्टविनायक गणेश मित्र मंडळ हे माझे कुटुंब आहे व मंडळातील सभासद हा माझा परिवार आहे.त्यामुळे मंडळातील सभासद अडचणीत असेल तर त्याची मदत करणे हे माझे कर्तव्यच आहे.

    *अविनाश जेऊरकर,संस्थापक*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *