संजय करडे यांच्या वाढदिवसानिमित्त विकासदादांच्या हस्ते वृक्षारोपन व शैक्षणिक साहित्य वाटप….!

पिलीव/सुजित सातपुते
दि.10/07/19
प्रत्येक ठिकाणी वृक्षतोड होत असल्याने निसर्गाचे संतुलन बिघडत असुन वृक्ष लागवडीबरोबच वृक्ष संवर्धन केले तरच निसर्गाचा समतोल राहिल व पर्जन्यात वाढ होईल असे प्रतिपादन रिपाइं(अ)चे सोलापूर जिल्हाउपाध्यक्ष विकास धाईंजे यांनी केले.रिपाइंचे पिलीव शहराध्यक्ष संजय करडे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व जिल्हा परिषद साठेनगर शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.दरम्यान श्रीमंत असो वा गरीब रूबाब मात्र बडेजाव करून वाढदिवसानिमित्त मित्र मंडळी यांना बोलावून हॉल,मंडप, डेकोरेशन अवाढव्य खर्च करणे आदी परंपरा सध्या समाजात जोमात सुरू असून शिवाय वाढती महागाई तर आहेच. तरी देखील समाजात अशा प्रवृत्तींना ऊत आला असून सर्व काही असतांना देखील समाजासाठी आपण काही तरी देणं लागतो या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासत संजय करडे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप व वृक्षारोपण करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे.यावेळी कार्यक्रमाला जेष्ठ पत्रकार दामोदर लोखंडे,सोशल डेव्हलपमेंटचे संस्थापक/अध्यक्ष डॉ.कुमार लोंढे,रिपाइं(अ)तालुकाउपाध्यक्ष रणजित सातपुते,आबा बनसोडे,महेश वाघमारे,कुमार लोखंडे,सागर लोखंडे,प्रफुल्ल वाघमारे,अजय सातपुते,साठेनगर शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वृंद यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *