चिखलाच्या मालिकेतून पिलीवकरांना कधी मिळणार सुटका ?
पिलीव/सुजित सातपुते
दि.9/10/10
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील बसस्थानक परिसरामध्ये (अहिल्या चौक बचेरी रोड ) थोडा जरी पाऊस पडला तरी चिखलाचे साम्राज पसरत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.यामधून मार्ग काढत असताना विद्यार्थांना,गावकर्यांना व बाहेर गावच्या प्रवाशांना खूप त्रास होत असून या त्रासातून आपली कधी सुटका होणार असा प्रश्न पिलीवकरांच्या मनामध्ये उपस्थित होत आहे.त्यामध्येच पंढरपुर-म्हसवड रोडचे अर्धवट राहिलेले काम व त्याकामासाठी रोडवरती टाकलेला मुरुम/माती यामुळे जास्तच चिखल होत असून सदर रोडचे काम हे संत गतीने चालू न ठेवता संबधितांनी लवकरात लवकर काम पुर्ण करणे गरजेचे असल्याचे पिलीवकरांतून बोलले जात आहे.