पिलीव येथील विविध संघटनांच्यावतीने आषाढीवारीतील विठ्ठल भक्तांना अल्पोहार….!

पिलीव/सुजित सातपुते
दि.9/7/19
माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील वाहन चालक मालक संघटना,पूर्व अहिल्या चौक,शेतकरी,व्यवसाईक व व्यापारी संघटना यांनी एकत्र येवून पिलीव नगरीत येणार्या प्रत्येक दिंडी प्रमुखाचा सरपंच नितीन माळी यांच्या हस्ते आदराने सन्मान/सत्कार करुन हजारो वारकर्यांना अल्पोहाराचे वाटप केले.हा उपक्रम गेल्या दहा वर्षापासून चालू असून भविष्य काळात ही हा उपक्रम असाच सुरु ठेवणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.यावेळी वरील संघटनांच्या पदाधिकार्यांची व कार्यकर्त्यांची वारकर्यांना अल्पोहार वाटप करण्यासाठी पहाटे पासूनच धडपड सुरु असल्याचे पहावयास मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *