डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वस्तिगृहाबाबत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात…!

पिलीव/सुजीत सातपुते
अकलूज येथे गेल्या 35 वर्षापासुन गोरगरीब विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिकता यावे सर्वसामान्य कुटुंबातील एखादे डाॅ.बाबासाहेब घडावेत या उद्देशाने शासनाने समाजकल्याण विभागाचे वतिने डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वसतिग्रहाची 1983 साली स्थापना केली परंतु सदरचे वसतिगृहाचे कुठे आहे हे दिसून येत नाही. सदर वसतिगृह हे इतरत्र भाडेतत्त्वावर चालवले जात आहे. गेली 35 वर्षात महिन्याला 70000/- प्रमाणे जवळपास 30 कोटी रुपयांवर खर्च हा भाडेतत्त्वावर खर्च झाले आहेत. परंतु सदर वसतिगृहाच्या इमारतीचा निधी मंजूर असून तो जागे अभावी पडून आहे. सदरचे वसतिगृह हे 80 विद्यार्थ्यांचे असून त्या वसतिगृहाला अकलूज या ठिकाणी जागा उपलब्ध होत नाही ही किती दुर्दैवाची बाब आहे. गेल्या 30 वर्षात अकलूज शहराचा सर्वांगीण विकास झाला अनेक शासकीय योजना अकलूज या ठिकाणी आणल्या सदर योजनांना जागा ही उपलब्ध झाल्या परंतु गोरगरीब विद्यार्थ्यांना शासनाने मंजूर करून 30 वर्षापासून असलेल्या वसतिगृहास मात्र जागा उपलब्ध झालेली नाही ही अतिशय खेदजनक बाब आहे विशेष म्हणजे माळशिरस तालुक्याचे गेली 10 वर्षांपासून अनुसूचित जाती जमातीतील प्रतिनिधी प्रतिनिधित्व करत आहेत परंतु त्यांनी ही या गोष्टीवर लक्षा दिलेले नाही. सध्या हेच वसतिगृह अकलूज येथील महावीर गांधी यांच्याकडे भाडेतत्त्वावर चालविले जात आहे सदर ठिकाण विद्यार्थ्यांना अनेक संकटांना समोरे जावे लागत आहे. सध्या या ठिकाणी पत्रे ऊचकटले आहेत सोलर असुनही सदर ठिकाणी लावता येत नसल्याने विद्यार्थ्यांना थंडीत ही गार पाण्याने आंघोळी करावी लागत आहे शासनाकडून या वसतिगृहासाठी अनेक विद्यार्थीच्या सुख सुविधेसाठी स्किमा मंजूर आहेत परंतु सदरचे वसतिगृह हे भाडेतत्त्वावर असल्याने याचा वापर करता येत नाही तरी या बाबत स्थानिक प्रतिनिधी व प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून सदर वसतिगृहास जागा उपलब्ध करून देण्यात यावी जेणेकरून या वसतिगृहातुन अनेक डाॅ.बाबासाहेब आंबेडकर घडतील अन्यथा दलित महासंघाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा मा. नगमाताई शिवपालक यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालय अकलूज येथे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी सदर निवेदण देताना जि उपअध्यक्ष सतिश महापुरे जि यु अध्यक्ष मारूती नाईकनवरे
ता अध्यक्ष संतोष मोघे संपत खिलारे आजिनात साठे नितीन नाईकनवरे दादा नाईकनवरे चैतन कांबळे आनेक कार्यकरते उपस्तीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *