पिलीव परिसरातील सर्व नागरिकांनी दहा रुपयेच्या नाण्यांची देवाण-घेवाण करावी-शाखा प्रबंधक ….!
पिलीव/सुजित सातपुते
रिझर्व्ह बँक अॉफ इंडियाचा आंचलिक कार्यालय (झोनल अॉफिस) व आंचलिक कार्यालयाचा संपुर्ण सोलापूर जिल्ह्यातील बँकांना दहा रुपयेची नाणी वैद्य असल्याचा व त्याची सुरळीतपणे देवाण-घेवाण करण्याचा आदेश आला आहे.त्यामुळे दहा रुपयांसह इतर नाण्यांची ग्राहकांनी,दुकानदारांनी व व्यापार्यांनी देवाण-घेवाण सुरळीतपणे चालू ठेवणे गरजेचे असून पिलीव शाखेमध्येही ज्यांच्याकडे दहा रुपयेची किंवा इतर नाणी असतील अशा ग्राहकांनी प्रत्येकी एक हजर रुपये नाण्यांचा भरणा करवा व त्या नाण्यांचा इतर ग्राहकांनी स्वीकारही करावा असे माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील बँक अॉफ इंडिया शाखेचे शाखा प्रबंधक श्री.संतोषकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.सध्या दहा रुपयेच्या नाण्यांबद्दल अफवा पसरवली जात असल्याने कोणीही दहा रुपयेची नाणी स्वीकारत नाही.परंतु सदरची नाणी ही वैद्य असल्याचे रिझर्व्ह बँकेने घोषित केले असल्याने ती नाणी स्वीकारण्यास कसलीही हरकत नाही.आपल्यात सुट्ट्या पैशांचा तुटवडा निर्माण होवू नये म्हणून दहाच्या व इतर नाण्यांची छपाई केलेली असते परंतु त्याच नाण्यांचा स्वीकार करण्यास एखादा व्यक्ती नकार देत असेल तर त्याच्यावर फौजदारी गुन्हां दाखल होवू शकतो.त्यामुळे दहाच्या व इतर नाण्यांची सर्वांनी सुरळीतपणे देवाण-घेवाण करावी व कोणी नकार देत असेल तर त्याचा पुरावा सादर करुन संबधितांवर पिलीव औट पोस्टला तक्रार दाखल करावी.असे ही शाखा प्रबंधक श्री.संतोषकुमार यांनी सांगितले.