सोशल डेव्हलपमेंट सोसायटीच्या वतीने सावित्रीमाई यांना अभिवादन…..
पिलीव/प्रतिनीधी
सोशल डेव्हलपमेंट सोसायटीच्यावतीने सदाशिवदेठे निवासी प्रशाला अँड ज्यु.कॉलेज आणि डायमंड इंग्लिश स्कूल चांदापुरी येथे सावित्रीबाई फ़ुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रा.सरक म्हणाले “सावित्रीबाई फुले म्हणजे त्याग आणि शिक्षण याचे जगातील उत्तम असे उदाहरण आहे.तर प्रा.दीपक काटे जयंतीनिमित्त बोलताना म्हटले की,आजची स्त्री शिकली ,सुसंस्कृत झाली ,प्रशासन,कायदा,राजकीय,साहित्य अशा सर्व क्षेत्रात उतुंग भरारी घेत आहे .हे सर्व देण म्हणजे सावित्रीबाई व महात्मा जोतीराव फुले यांचे उपकार आहेत
अनेक विद्यार्थ्यांनी भाषणे करून समतेचा नारा दिला यावेळी,डी. जी लोंढे सर,आर्शिद पठाण सर,प्रा.के साठे,नमिता म्याडम व संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन पूजा मगर हिने केले तर आभार प्रा.अल्ताफ पठाण यांनी मानले