उद्या पिलीव येथे गुरुजनांचा सन्मान करत रंगणार भव्य”शिवनेरी दहीहंडी” उत्सव !
पिलीव/ सुजित सातपुते
संस्कृती,परंपरा आणि गोविंदांच्या उत्साहाचे प्रतीक असलेला दहीहंडी उत्सव माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे उद्या शनिवार दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी सायंकाळी 6:00 वाजता अत्यंत दिमाखात साजरा केला जाणार आहे. शिवराज पुकळे युवाशक्तीच्या वतीने आयोजित ‘शिवनेरी दहीहंडी उत्सव २०२६’ च्या माध्यमातून यंदा केवळ खेळालाच नव्हे, तर समाजाला घडवणाऱ्या गुरुजनांचा गौरव करून एक वेगळा पायंडा पाडला जात आहे.
भारतीय संस्कृतीत दहीहंडी उत्सवाला एकात्मता, संघभावना आणि उत्साहाचे मोठे स्थान आहे.थरांवर थर रचून हंडी फोडण्याचा हा थरार युवकांमध्ये जिद्द आणि सहकार्याची भावना निर्माण करतो.याच संस्कृतीचे जतन करत पिलीव शहरात भव्य आणि शिस्तबद्ध पद्धतीने हा उत्सव आयोजित करण्यात आला आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवराज पुकळे युवाशक्ती,श्री.शिवराज पुकळे(माजी जिल्हाध्यक्ष, भाजप युवा मोर्चा सोलापूर ग्रामीण पश्चिम)आणि सौ. नम्रता शिवराज पुकळे(पंचायत समिती सदस्या,पिलीव गण) यांच्यामार्फत करण्यात आले आहे,उत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे हंडी पूजनाचा आणि उद्घाटनाचा मान मार्गदर्शक गुरुजनांना देण्यात आला आहे. शिक्षकांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा आगळावेगळा उपक्रम आहे. या कार्यक्रमांमध्ये गोविंदा पथकासाठी लाखों रुपयांची रोग बक्षिशी ठेवण्यात आली असून खास आकर्षण म्हणून प्रेक्षकांसाठी सांस्कृतिक मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.
या भव्य दहीहंडी उत्सवाचा आणि थरारक गोविंदा पथकांच्या खेळाचा आनंद घेण्यासाठी परिसरातील नागरिकांनी व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन आयोजक शिवराज पुकळे युवाशक्तीच्या वतीने करण्यात आले आहे.