सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली “अकलूज” पोलिसांची मोठी कारवाई : पिस्तुलांसह १८.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त
पिलीव/सुजित सातपुते
अकलूज पोलिसांनी अवैधरीत्या अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या सहा जणांवर कारवाई करून १७ देशी बनावटीची पिस्तुले, ४७ जिवंत काडतुसे आणि टाटा नेक्सॉन कार असा एकूण १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई १४ ते १६ ऑगस्टदरम्यान करण्यात आली.
गोपनीय माहितीच्या आधारे अकलूज पोलिसांनी ही कारवाई केली. तपासादरम्यान विविध ठिकाणी छापे टाकून संशयितांकडून अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. या प्रकरणी विकास कैलास वजाळे, राहुल सतीश माने, शनिभारत बनसोडे,महादेव बाळासाहेब कोरके,विजय सदाशिव किरणगी, अनिल पंचलाल मेहता आणि सुमित नाना लवटे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

आरोपींकडे अग्निशस्त्रे व जिवंत काडतुसे बाळगण्याचा कोणताही वैध परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके व अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम पोरे,शिवकुमार मदभावी,राहुल रणवरे,अमोल बकाल,समीर पठाण,दत्तात्रय खरात,रणजीत जगताप, तुकाराम माने-देशमुख,विजय तवटे,त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या पथकातील शरद कदम,स्वप्निल गायकवाड,सुरज हेंबाडे,अनिल शिंदे,प्रवीण मिटकरी यांच्यावतीने अतिशय गोपनीय पद्धतीने सदर गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यात अवैध अग्निशस्त्रे व शस्त्रांशी संबंधित गुन्ह्यांविरोधात प्रभावी कारवाईची मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले,