लेंगरेवस्तीच्या जि.प.शाळेत भरला चिमुकल्यांचा आठवडा बाजार..!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील लेंगरेवस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज आठवडी बाजार या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन पिलीव केंद्राचे केंद्र प्रमुख मा.श्री. राजकुमार फासे सर शिक्षक श्री. विश्वनाथ शिवणगे व श्री. भागवत चौगुले सरांच्या मार्गदर्शनाखाली केले होते.शालेय शिक्षण घेत असताना प्रत्यक्ष अनुभवातून व कृतीतून विद्यार्थ्यांना उपयुक्त शिक्षण मिळावे व खर्या कमाईचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावे हा या उपक्रमागचा हेतू होता.
ओsss
या इकडं…
भाजी घ्या भाजी…!
ताजी ताजी भाजी….!!
गुळ शेंगादाण्याचे पौष्टिक लाडू घ्या अन् आजाराला ठेवा दूर
ओ मामा… , ओ ताई… या इकडं…
याचबरोबर लाडू चिवडा स्टाॅल , चहा स्टाॅल , गरमागरम उकडलेली देशी अंडी , बटाटा चिप्स इ.पदार्थ विद्यार्थ्यांनी विकले.बाजारात खरेदी करणेसाठी कुसमोड करांनी भाऊगर्दी केली होती.या प्रसंगी जि.प.प्रा.शाळा, लेंगरे वस्ती चे शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष मा श्री अंकुश लेंगरे, माजी अध्यक्ष मा श्री वसंत लेंगरे, संजय लेंगरे, नागेश लेंगरे, जयंत लेंगरे, नितीन लेंगरे तसेच दूध डेअरी चे मालक मा.श्री. सुभाष काळे, अशोक लेंगरे, सौ.लतिका चौगुले, सौ.निर्मला लेंगरे, सौ. ललिता लेंगरे व अनेक मान्यवर उपस्थित होते.वैशिष्ट्ये म्हणजे या बाजारात खरेदीसाठी 85 वर्षाच्या आजीबाई रुक्मिणी लेंगरे या आवर्जून उपस्थित होत्या या बाजाराला पिलीवचे शिक्षक श्री. सचिन गाटे सर यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले व बाजारात खरेदी केली.या बाजारात जवळपास 55 गावकर्यांनी खरेदी केल्याने मुलांचा आनंद द्विगुणीत झाला.या प्रसंगी विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या विविध चित्रांच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केले.विद्यार्थ्यांनी काढलेली रंगीबेरंगी चित्रे पाहून गावकरी मंत्रमुग्ध झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *