दुबई येथे चांदापुरी येथील सदाशिव देठे निवासी प्रशाला ज्युनि.कॉलेज व डायमंड इंग्लिश स्कुलचे संस्थापक डॉ.कुमार लोंढे यांचा आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मान….!

पिलीव/सुजित सातपुते
माळशिरस तालुक्यातील चांदापुरी सारख्या ग्रामीण भागातील सदाशिव देठे निवासी प्रशाला जु.कॉलेज,डायमंड इंग्लिश स्कूलचे संस्थापक डॉ.कुमार लोंढे यांना दुबई येथे चित्कारा विद्यापीठाने आयोजित केलेल्या जागतिक आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये ” इंटरनॅशनल स्कूल अवॉर्ड ” देऊन सन्मानित करण्यात आले.या परिषदेमध्ये एकूण साठ देश सहभागी झाले होते ही परिषद दुबई येथील पंचतारांकित ली मेरिडियन हॉटेल या ठिकाणी चार दिवस आयोजित केली होती.यामध्ये वेगवेगळ्या देशातील कुलगुरू,विचारवंत,शिक्षणमंत्री,शाळा, कॉलेज व सखोल ज्ञान असणारे विविध देशाचे सल्लागार सहभागी होते.
अफगाणिस्तान सरकारचे शिक्षा मंत्री व सल्लागार डॉ.अत्तताउल्लाह वाहिदयार,पाकिस्तानचे शफीक रफिकी,भारताचे प्रसिद्ध लेखक केतन भगत,चित्कारा विद्यापीठाच्या डॉ.नियती चित्कारा, यु एस ए अमेरिकेच्या विंन्नी गर्ग,दुबई चे व्याख्याते रॉबर्ट्स,नेदरलँडचे डॉ.मॉरिस डी होंड व अक्षय आहुजा यांचे उपस्थित डॉ.कुमार लोंढे यांचा व सदाशिवदेठे प्रशाला ज्यु.कॉलेज,डायमंड स्कूल चांदापुरी यांचा इंटरनॅशनल स्कूल अवॉर्ड ने सर्वांच्या उपस्थित सन्मान करण्यात आला.या पुरस्कारासह डॉ.कुमार लोंढे यांना सामाजिक व शैक्षणिक कामाची दखल घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर अवॉर्ड दिल्ली,संत मदर तेरेसा अवॉर्ड नागपूर,आंतराष्ट्रीय मानवाधिकार पुरस्कार ,बहुजन परिवर्तनीय पुरस्कार,माळशिरस तालुका गौरव पुरस्कार व लोकराजा शाहू पुरस्कार सांगली असे विविध पुरस्कार त्यांना कार्याची पोचपावती म्हणून मिळाले आहेत.त्यांनी हा मिळालेला पुरस्कार आरक्षणाचे जनक लोकराजा शाहू महाराज यांना अर्पित केला आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे राजिकय व सामाजिक व ग्रामीण स्तरातून जोरदार अभिनंदन व कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *