अष्टविनायक गणेश मित्र मंडळाच्या 31 व्या अध्यक्षपदी तन्मय काळे यांची सर्वानुमते निवड !

पिलीव/सुजित सातपुते

सामाजिक,धार्मिक आणि सांस्कृतिक कार्याची 31 वर्षांची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या अष्टविनायक गणेश मित्र मंडळ ST स्टॅन्ड पिलीव, या मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड शुक्रवार, दि. 3 जुलै 2026 रोजी अष्टविनायक कॉम्प्लेक्स,पिलीव येथे झालेल्या बैठकीत करण्यात आली.आगामी गणेशोत्सव अधिक भव्य व शिस्तबद्ध साजरा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीत मंडळाच्या आगामी उपक्रमांचे नियोजन, गणेशोत्सवातील विविध कार्यक्रम, ढोल-ताशा पथक, मिरवणूक व्यवस्था तसेच सामाजिक उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर सर्व सदस्यांच्या एकमताने नवीन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीमध्ये संस्थापक – अविनाश जेऊरकर, आधारस्तंभ – प्रकाश (अबा) जाधव, अध्यक्ष तन्मय काळे, उपाध्यक्ष अक्षय माने व अतिष जेऊरकर,कार्याध्यक्ष तनेश सूर्यवंशी,सचिव किरण घोरपडे, सहसचिव ओंकार मोरे, खजिनदार तुषार जाधव, सल्लागार ॲड. वैभव मेथवडे, श्याम उपाध्ये व लक्ष्मण भैस, व्यवस्थापक जुबेर पठाण व गणेश सूर्यवंशी, ढोल पथक प्रमुख प्रमोद माने व सनी भंडलकर, ताशा पथक प्रमुख हर्षद माने व विशाल साळे तसेच मिरवणूक प्रमुख सौरभ काळे, दत्ता काळे, योगेश पाटील व कैलास फाळके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या बैठकीस संस्थापक अविनाश जेऊरकर, प्रकाश (अबा) जाधव, ॲड. वैभव मेथवडे, श्याम उपाध्ये, लक्ष्मण भैस, अमोल गांधी, तुषार जाधव, जुबेर पठाण, दीपक केसकर, अनिकेत नष्टे, गणेश सूर्यवंशी, अजित करडे, रत्नाकर खरात, अरोह जेऊरकर, कैलास फाळके, दीपक वाघमारे, योगेश पाटील, श्रीनिवास महामुनी, विजय देशमुख, प्रशांत देशमुख, सौरभ काळे, अमोल लोखंडे, ऋषी बाबर, अमन बोराटे यांच्यासह मंडळाचे सर्व पदाधिकारी, सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी नव्याने निवड झालेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. यंदाचा गणेशोत्सव धार्मिक परंपरा, सामाजिक बांधिलकी आणि युवकांच्या उत्स्फूर्त सहभागातून अधिक भव्य व आदर्शवत साजरा करण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *