व्यापारी प्रतिष्ठान गणेश मित्र मंडळ पिलीवच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड : सामाजिक सलोखा राखून गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार !

पिलीव/ सुजित सातपुते

व्यापारी प्रतिष्ठान गणेश मित्र मंडळ,पिलीव यांच्या वतीने काल सायंकाळी ७ वाजता हॉटेल राजवाडा येथे मंडळाच्या वार्षिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत आगामी गणेशोत्सवाचे नियोजन, मंडळाच्या विविध उपक्रमांवर चर्चा करण्यात आली.तसेच एकमताने मंडळाच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

बैठकीत मंडळाच्या अध्यक्षपदी सुनील चव्हाण व सचिन भैस,कार्याध्यक्ष कपिल कोळी,खजिनदारपदी सचिन अवताडे सर, सचिवपदी अमीर शेख व सोमनाथ गाढवे यांची निवड करण्यात आली.यांची निवड करण्यात आली. तर मिरवणूक प्रमुख म्हणून रोहन कालेकर,अजय खलीपे,श्रीकांत आर्वे,सुजित( छोटू )खलीपे व सुरज करांडे यांची निवड करण्यात आली.

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थित व्यापारी,सभासद व मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.आगामी गणेशोत्सव सामाजिक सलोखा,धार्मिक उत्साह आणि विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आम्ही सर्वजण उत्साहात साजरा करण्याचा नवीन पदाधिकाऱ्यांनी निर्धार व्यक्त केला. यावेळी बैठकीस व्यापारी प्रतिष्ठान गणेश मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *